Good News! धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, वाचा प्रतितोळा सोन्याचे दर
आज सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले आहेत. आज किती आहेत दर, जाणून घेऊयात.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. सोमवारी सोन्याचे दर वधारले होते. मात्र आज मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर व्यवहार सुरू होताच चांदीचे दर 4400 रुपये प्रति किलोने घसरले आहेत. तर. 10 ग्रॅम सोन्याचे दर कोसळले असून 1300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी वायदा बाजार सुरू होताच 4 डिसेंबरच्या वायदा असलेल्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव कोसळून 1,38,800 रुपयांवर पोहोचला. तर, मागील काही दिवसांपूर्वी 1,40,186 वर सोनं व्यवहार करत होते. एका झटक्यात सोनं 1386 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
एमसीएक्सवर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी चांदी 4600 रुपयांनी उसळून 1.83 रुपयांवर पोहोचली होती. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा चांदी 1.80 लाख रुपयांवर स्थिरावली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदी 1.79.350 रुपयांवर ट्रेड करतेय.
चांदीच्या दरात अलीकडे झालेल्या घसरणीमुळे, ती तिच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षाही स्वस्त झाली आहे. वास्तविक पाहता, 29 जानेवारी 2026 रोजी चांदीच्या किमतीने सर्व विक्रम मोडत, प्रथमच 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडून 4,20,048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता ती या पातळीपेक्षा 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.
सोमवारी सोने आणि चांदीच्या वायदे दरात वाढ झाली असली तरी, देशांतर्गत बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू सातत्याने स्वस्त होत आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA.Com) वेबसाइटनुसार, 2 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 30 ऑक्टोबरच्या 1,40,054 रुपयांवरून 2530 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 1,37,524 रुपयांवर आला होता. तसेच, 1 किलो चांदीचा भाव 30 ऑक्टोबरच्या 1,81,344 रुपयांच्या तुलनेत 1372 रुपयांनी कमी होऊन प्रति किलो 1,79,972 रुपयांवर आला होता.