देशातील सर्वात मोठ्या बँकेचा ग्राहकांना धक्का! लोन महागलं, किती असेल EMI?
सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. या बँकेचे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग झालं आहे. नवीन दर तीन दिवसांपूर्वीच लागू करण्यात आले आहेत.
भारतात दिवाळीचा उत्साह सुरू असताना देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने तीन दिवसांपूर्वी म्हणजे 7 नोव्हेंबरला मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) सर्व सातही कालावधींसाठी 5 ते 15 बेसिस पॉइंट्सची वाढ लागू केली आहे. यामुळे आता ग्राहकांना होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनवर थेट परिणाम होणार आहे.
एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर दर हे पूर्वी 7.75% ते 8.55% या श्रेणीत होते. आता ते वाढून 7.85% ते 8.70% करण्यात आले आहेत. तसंच बँकेने 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांसारख्या दीर्घकालीन कर्जांवरील दरांमध्ये थेट 15 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.15% ने वाढ करून ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.
किती ईएमआय द्यावी लागणार?
आता ग्राहकांना सर्वात मोठा प्रश्न पडला आहे, तुमचे इएमआय वाढणार का? तर तुम्ही एमसीएलआर लिंक्ड लोन 20 लाखांचं लोन 20 वर्षासाठी तुम्ही व्याज 8 टक्के देत असाल तर यापुढे तुम्हाला 8.15 टक्क्याने व्याज द्यावे लागणार आहे. आता साधणार गणित समजून घेऊयात 8 टक्के व्याजावर तुमचा ईएमआय 16,729 होता तर तो आता 8.15 टक्के झाल्याने दरमहा हप्ता 16,916 रुपये तुमच्या बँक खात्यातून जाणार आहे. म्हणजे तुमच्या इएमआयमध्ये 200 रुपये अधिक दावे लागणार आहे.
तुमचा EMI लगेच वाढणार का?
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या बँक अकाऊंटमधून वाढलेला इएमआय लगेचच जाणार का? तर तुमचे फ्लोटिंग-रेट गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआरशी जोडलेले असेल तर तुमचे कर्ज अधिक महाग झालं यात काही शंकाच नाही. पण हा वाढलेला इएमआय पुढच्या महिन्यापासून कापला जाणार आहे का?
तर नाही, हे लगेचच होईल असं स्पष्टपणे बँकेकडून सांगण्यात आलेले नाही. तुमच्या कर्ज करारामध्ये नमूद केलेली रीसेट तारीख आल्यावर याचा तुमच्या ईएमआयवर परिणाम होईल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.