SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

SBI सायबर हल्ल्याबद्दल मोठी अपडेट! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? बँकेकडून अधिकृत पत्रक जारी

SBI मध्ये सायबर हल्ल्यामुळे 4000 रेकार्ड लीक झाल्याचा खुलासा बँकेकडून करण्यात आल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या पैशांबद्दल चिंता वाटतंय. अशात बँकेकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलंय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 23, 2026, 08:41 PM IST | Updated: Oct 23, 2026, 09:11 PM IST
Image Credit: SBI cyberattack
Join

देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. बँकेवरील सायबर हल्ल्याच्या बातमीला बँकेकडूनही दुजारा मिळाल्यानंतर बँकिंग क्षेत्रासह देशभरात खळबळ माजली आहे. त्यासोबत सर्वात जास्त एसबीआय बँकेत अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ही गोष्ट लक्षात घेत स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वाची अपडेट देणारे पत्रक जारी केलं आहे.

कोणत्या ग्राहकांचा डेटा लीक झाला?

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर एक पत्रक शेअर केलं आहे. या पत्रकात त्यांनी सांगितलंय की, ज्या ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे, त्यांना बँकेकडून ईमेल आणि  व्हॉट्सॲपवर वैयक्तिकरित्या माहिती देण्यात आली आहे. सोबत ग्राहकांना कळवण्यात आलं की, त्यांच्या अकाऊंटमधील ठेवी आणि शिल्लक रक्कम सुरक्षित आहे. त्यांनी पुढे असंही नमूद केलंय की, अशीच एक घटना जुलै महिन्यात बँक ऑफ बडोदामध्ये घडली होती. 

 

ग्राहकांनी या गोष्टीची काळजी घ्यावी!

ज्या ग्राहकांना त्यांचा डेटा लीक झाला अशी माहिती दिली आहे, त्या ग्राहकांना एसबीआयने काही गोष्टीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, या ग्राहकांनी खास करुन डिजिटल बँकिंग वापरताना जास्त काळजी घ्यायची आहे. ग्राहकांनी आपला ओटीपी, एटीएम किंवा डेबिट कार्ड पिन आणि पासवर्ड कोणासोबतही काही झालं तरी शेअर करू नये. तसंच, त्यांना संशयास्पद फोन कॉल्स, मेसेजेस आणि ईमेल्स आल्यास त्याची लगेचच तक्रार नोंदवायची आहे. शिवाय अशा गोष्टीशी डील करताना सावध राहायचं आहे.  एसबीआयने ग्राहकांना सांगितलंय की त्यांनी काळजी करायची गरज नसून या घटनेची चौकशी सुरू आहे. 

एसबीआयने यापूर्वीच जाहीर केलं आहे की, या डेटा लीकमध्ये ग्राहकांची नावे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ईमेल पत्ते, घराचे पत्ते, शाखा आणि ग्राहक आयडी क्रमांक, तसंच कर्ज आणि लीड रेकॉर्डश आहेत. 

दरम्यान ग्रँट थॉर्नटन इंडियाचे भागीदार विवेक अय्यर हे या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, डिजिटायझेशन आणि एआयमुळे सायबर हल्ल्यांची व्याप्ती सातत्याने बदलत असल्याचे पाहिला मिळत आहे. ही सध्याच्या स्थितीमधील सर्वात चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेत भविष्यात वित्तीय संस्थांनी केवळ त्यांची सायबर सुरक्षाच नव्हे, तर त्यांची सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर्स देखील मजबूत करणे अतिशय गरजेचे झाली आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES