मुंबई लोकल आता वेळेत स्थानकात येणार, पश्चिम रेल्वेने हाती घेतला वेगळा प्रयोग
मुंबई लोकल आता वक्तशीर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील पाचवी-सहावी मार्गिकेवर लोकल चालवण्यात येणार आहेत.
बोरीवली ते कांदिवली दरम्यान नेहमीच लोकल थांबते. स्टेशन अगदी जवळ असतानाही लोकल रखडत जाते. मात्र आता प्रवाशांच्या लोकल प्रवासाला वेग येणार आहे. पश्चिम रेल्वेने पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा काही प्रमाणात लोकलसाठी वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगामुळं बोरिवलीकडे जाताना लोकलचा खोळंबा होणार नाही. तसंच, प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
बोरीवली आणि कांदिवली या दोन स्थानकांच्यामध्ये अनेकदा लोकल 2 ते 5 मिनिटे थांबते. यामुळं आधीच गर्दी आणि त्यात लोकलचा खोळंबा यामुळं प्रवाशांना नाह त्रास सहन करावा लागतो. यावर प्रवाशांनी वारंवार आक्षेपदेखील नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने या महिन्यापासून बोरिवली ते सांताक्रूझदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाचा काही भाग किंवा संपूर्ण मार्ग लोकलसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे.
सध्या दररोज बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या किमान 10 लोकल पाचव्या मार्गावरून चालविल्या जात आहेत. या सेवा प्रामुख्याने गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त चालविल्या जातात. हा मार्ग कांदिवली कारशेडच्या बाजूने मुख्य मार्गापासून वेगळा जात असल्याने कांदिवली-बोरीवलीदरम्यान होणारा थांबा टाळता येतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बोरीवली-कांदिवलीदरम्यान सिग्नलसाठी रूट रिले इंटरलॉकिम यंत्रणा लागू झाल्यापासून बोरीवली स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी लोकलला थांबा मिळतो. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
कशी आहे पाचवी-सहावी मार्गिका
पाचवा आणि सहावा मार्ग प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय 3 लोकलच्या वाहतुकीचे विभाजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन या नव्या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. सध्या कांदिवली-बोरीवलीदरम्यान सहावा मार्ग उपलब्ध नसून, खार-सांताक्रूझ ते कांदिवलीदरम्यान तो उपलब्ध आहे.