मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेनंतर आता आणखी एक नवीन योजना; कोणत्या महिला ठरणार पात्र?
लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अजून एका नवीन योजना आखली आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजून एक नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहेत. ही नवीन योजनादेखील महिलांसाठी असणार आहे. ही नवीन योजना खासकरून एकल महिलांसाठी असणार आहे, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी अखिल भारतीय पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबई यांच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली की, महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजमधील वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळी करण्यात येत आहे. ज्या महिला नवरा नसताना एकट्याने संसाराचा गाडा सांभाळते त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. जेव्हा या योजनेसाठी महाराष्ट्रातील महिलांचा माहिती गोळा करण्यात येत असताना सर्व्हेनुसार राज्यात 3 लाख एकल महिला आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, ज्या विद्यार्थ्यांना वडील नाही त्यांना या नवीन योजनेचा फायदा होणार आहे.
राज्यात लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली असून या योजनेतर्गंत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे 2024 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस सरकारसाठी गेम चेंजर ठरली होती. दरम्यान महाराष्ट्रात 12 लाखहून अधिक एकल महिला आहेत. या योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. या एकल महिलांना आर्थिक मदतीसोबत सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. दरम्यान या नवीन योजनेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय या योजनेचा लाभार्थ्यांसाठी कोणते निकर्ष असणार आहे, याबद्दलही सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. तसंच या योजनेचे स्वरूप, लाभाची रक्कम आणि अंमलबजावणीची तारीख याबाबत अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.