• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /ऑनलाइन शॉपिंगचे सरकारने बदलले नियम, खरेदीचे नियम बदलणार! कोणकोणते नियम लागू होणार?

ऑनलाइन शॉपिंगचे सरकारने बदलले नियम, खरेदीचे नियम बदलणार! कोणकोणते नियम लागू होणार?

तुम्ही जवळच्या बाजारामध्ये जाण्यापेक्षा ऑनलाईन शॅापिंग करणे पसंत करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरु शकते. ऑनलाईन शॅापिंगच्या नियमांमध्ये सरकार मोठे बदल करणार आहे हे बदल कोणते असणार आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 19, 2026, 19:33 IST|Updated: Nov 19, 2026, 19:55 IST
joinshare
ऑनलाइन शॉपिंगचे सरकारने बदलले नियम, खरेदीचे नियम बदलणार! कोणकोणते नियम लागू होणार?

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जर तुम्हालाही ऑनलाईन शॅापिंग करायची सवय असेल आणि तुम्ही जवळच्या बाजारामध्ये जाण्यापेक्षा ऑनलाईन शॅापिंग करणे पसंत करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरु शकते. जर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतर कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वारंवार ऑनलाइन खरेदी करत असाल, तर आता शॅापिंगच्या नियमांमध्ये काही मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. मेगा सेल किंवा ऑफर अनेक ऑनलाइन शॅापिंग प्लॅटफॉर्मवरून दिली जाते पण अनेकांना ऑनलाइन सेल दरम्यान उत्पादनांवर 50 ते 80 टक्के सूट दाखवली जाते, परंतु ग्राहकांना किमतीतील खरी घट अनेकदा समजत नाही.

अनेकदा काही वेबसाइट्स अतिरिक्त शुल्क आकारतात आणि काही मोठ्या ऑफर देतात ज्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक घाईघाईने खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. आता, अशा समस्या कमी करण्यासाठी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम बदलले आहेत. सरकार कोणकोणते नवे नियम लागू करणार आहे यासंदर्भात सविस्तर तुम्हाला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 मध्ये सुधारणा केल्यानंतर, नवीन नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील. या नियमांनुसार, कंपन्यांना सवलतीसह गेल्या 30 दिवसांतील सर्वात कमी किंमत प्रदर्शित करावी लागेल.

ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलणार

  • ऑनलाइन खरेदी करताना, तुम्ही अनेकदा उत्पादने 60 किंवा 70 टक्के ऑफर असलेली दाखवली जातात, नवीन नियमांनुसार, कंपन्यांना अधिक पारदर्शकता ठेवावी लागेल. जर एखाद्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने उत्पादनाच्या किंवा सेवेच्या किंमतीत कपात केल्याचा दावा केला, तर त्यांना नवीन किंमतीसोबत जुनी किंमतही दाखवणे बंधनकारक आहे.
  • ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर एखादी वस्तू शोधताना, सर्वात वर अनेक उत्पादने दिसतात. यांपैकी काही उत्पादने ब्रँड्स किंवा विक्रेत्यांद्वारे सूचीबद्ध केलेली असतात. आता या नियमामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे, ग्राहक सामान्य शोध परिणामांमध्ये दिसणारी उत्पादने आणि पैसे देऊन खरेदी केलेली उत्पादने यांच्यात फरक करू शकतात.
  • तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स ॲपवर 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन शोधता. तुम्हाला त्या बजेटमधील आणि तुमच्या गरजेनुसार फोन दिसण्याची अपेक्षा असते. अनेकदा ते आपल्याला मिळत नाही,  नवीन नियमांनुसार, ई-कॉमर्स कंपन्या शोध निकालांमध्ये म्हणजेच सर्चमध्ये किंवा शोध सूचीमध्ये फेरफार करता येणार नाही.
  • ऑनलाइन वस्तू खरेदी करताना, ग्राहकांना अनेकदा उत्पादन कोण विकत आहे, त्याच्या वॉरंटीचा कालावधी किती आहे, किंवा वस्तू परत करण्याच्या अटी व शर्ती काय आहेत, हे माहीत नसते. नवीन नियमांनुसार, मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मना ग्राहकांना आवश्यक माहिती देणे बंधनकारक असेल.
  • ऑनलाइन खरेदी करताना, ग्राहकांना वस्तूच्या किमतीव्यतिरिक्त इतर शुल्क आकारले जात असल्याचे लक्षात येते, ज्याबद्दल त्यांना पूर्वी माहिती नसते. नवीन नियमांनुसार, ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत.
Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News