SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Royal Enfield च्या या बाईकला तुफान मागणी, कंपनीला थांबवावी लागली बुकिंग, काय आहे इतकं खास?

रॉयल एनफील्डने आपली जुनी 'हिमालयन'ची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेता रॉयल एनफिल्डने 'हिमालयन 440' बाजारात आणली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 01, 2026, 02:55 PM IST | Updated: Oct 01, 2026, 02:58 PM IST
Join

रॉयल एनफील्डने आपली जुनी 'हिमालयन'ची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेता रॉयल एनफिल्डने 'हिमालयन 440' बाजारात आणली आहे. ही बाईक बऱ्याच अंशी तिच्या आधीच्या आवृत्तीचे मूळ वैशिष्ट्य टिकवून ठेवत असली, तरी कंपनीने तिच्या इंजिनमध्ये सुधारणा केली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या या बाईकला इतकी प्रचंड मागणी आहे की, कंपनीने सध्या तिचे बुकिंग थांबवले आहे.

रॉयल एनफील्डने आपली जुनी बाईक हिमालयनची लोकप्रियता पाहता, हिमालनय 440 लाँच केली आहे. ही बाईक जवळपास जुन्या हिमालयनसारखीच आहे. पण कंपनीने या बाईकच्या इंजिनला अपडेट केलं आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या या बाईकला खूप मोठी मागणी आहे. यामुळे कंपनीने सध्या या बाईकची बुकिंग थांबवावं लागलं आहे.

रॉयल एनफिल्डने अलीकडेच 'हिमालयन 440' (Himalayan 440) ही बाईक लाँच केली. लाँच होताच या बाईकला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि कंपनीला मोठ्या संख्येने बुकिग मिळाल्या. परिस्थिती अशी ओढवली की, वेटिंग पिरियड (प्रतीक्षा कालावधी) खूप वाढल्यामुळे कंपनीला बुकिंग्ज थांबवाव्या लागल्या आहेत.

ही बाईक सप्टेंबरच्या सुरुवातीला लाँच करण्यात आली होती. सध्या वेटिंग पिरियड सहा महिन्यांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे कंपनीला नवीन बुकिंग कारणे थांबवावे लागले आहे.

किंमत किती आहे?

हिमालयन 440 ही बाईक 4 सप्टेंबर रोजी 2.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीत लाँच करण्यात आली. या लाँचिंगद्वारे कंपनीने मूळ 'हिमालयन'चा फॉर्म्युला परत आणला आहे. विशेष म्हणजे, 'हिमालयन 450' लाँच झाल्यानंतर अनेक बाईक-प्रेमींना मूळ 'हिमालयन' मॉडेलची उणीव भासत होती.

ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन कंपनीने ही बाईक नवीन 440 सीसी (440cc) इंजिनसह बाजारात आणली आहे. सध्या या बाईकसाठी प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) सहा महिन्यांपर्यंत पोहोचला आहे; त्यामुळे रॉयल एनफिल्डने तात्पुरत्या स्वरूपात बुकिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कंपनी उत्पादनात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

बुकिंग पुन्हा सुरू झाल्यावर किंमतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही. मात्र, बुकिंग पुन्हा कधी सुरू होईल, याची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

ही बाईक खास का आहे?

'हिमालयन 440' (Himalayan 440) मध्ये 443 सीसीचे सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 25.4 एचपी (HP) ची पॉवर आणि 34 एनएम (Nm) चा टॉर्क निर्माण करते. याला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. या मोटरसायकलची डिझाइन बऱ्याच अंशी आधीच्या 'हिमालयन 411' (Himalayan 411) सारखीच आहे.

यात 21-इंच आकाराचे पुढचे चाक आणि 17-इंच आकाराचे मागचे चाक देण्यात आले आहे. या बाईकचा ग्राउंड क्लिअरन्स 220 मिमी इतका असून, यात 'ड्युअल-चॅनेल एबीएस' (ABS) ही सुविधा स्टँडर्ड म्हणून मिळते. ही बाईक 'सेला ब्लॅक' (Sela Black), 'मस्टँग ब्राऊन' (Mustang Brown) आणि 'नेलॉन्ग व्हाईट' (Nelong White) अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES