या वर्षात आपण सोने - चांदीचे दर एवढे वाढताना पाहिले की, सोनं हे ग्राहकांच्या खरेदीच्या बाहेर गेला. भारतीय लोक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्याची गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित मानली जाते. गेल्या चार पाच दिवसात सोन्याचे किंमतीत घसरण पाहिला मिळाली. पण काल स्वस्त झालेले सोनं शनिवारी (28 नोव्हेंबरला) पुन्हा महाग झालं. नवीन वर्षात 2027 मध्ये 10 ग्रॅम सोनं हे 2.38 लाखांच्या घरात जाईल, अशी शक्यता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय विश्लेषक अॅलेस्टेयर मॅकलॉड यांनी वर्तवली आहे.
MINING.COM च्या 'टॉप ऑफ माइन' या कार्यक्रमात मॅकलॉड यांनी ही भीती व्यक्त केली. या कार्यक्रमातून सोन्याबद्दल असलेला मोठ्या गैरसमज त्यांनी दूर केला आहे. जेव्हा सोन्याची किंमत वाढते तेव्हा लोकांना वाटतं धातूचे मूल्य वाढतं. पण मॅकलॉड यांनी सांगितलं की, सोन्याची किंमत वाढते म्हणजे सोन्याच्या मूल्यातील प्रत्यक्ष ती वाढ नसते. तर हा परिणाम अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणामुळे असतं. ते म्हणाले की, बहुतेक गुंतवणूकदार या मूलभूत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. जेव्हा एखाद्या चलनाची क्रयशक्ती कमी होते, तेव्हा सोने संरक्षणाचे सर्वात विश्वसनीय साधन मानले जाते.
बाजारात बऱ्याच काळापासून असा समज पण आहे की, जेव्हा अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवते, तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ होते. त्यांनी यामागील कारणही सांगितलं ते म्हणाले की, सोन्यावर कोणतेही व्याज किंवा परतावा मिळत नसतो. ज्यामुळे गुंतवणूकदारांना व्याज देणाऱ्या साधनांकडे वळण्यास भाग असतं. ते पुढे असंही म्हणाले की, फेडरल रिझर्व्हच्या पुढील संभाव्य व्याजदरवाढीबद्दलची अनिश्चितता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन चलनावर घोंघावणाऱ्या मोठ्या धोक्यांपासून विचलित करताना दिसत आहे. सोन्याचे मूल्यमापन केवळ व्याजदरांच्या आधारावर करणे ही एक गंभीर चूक ठरणार यात काही शंका नाही.
मॅकलॉड यांनी या कार्यक्रमातून अमेरिकेच्या वित्तीय प्रणालीतील वाढत्या धोक्यांबद्दलही इशारा देत म्हटलं की, प्रत्यक्षात अमेरिकन गुंतवणूकदारांकडे सोन्याचा साठा खूपच कमी आहे. तर शेअर बाजार गंभीर मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जर अमेरिकेतील बाजारात पैशांची चणचण भासू लागली तर खूप मोठी समस्या निर्माण होईल. तर गुंतवणूकदारांना पैसे उभारण्यासाठी सर्व प्रकारची मालमत्ता विकण्याची वेळ येऊ शकते. मॅकलॉड यांनी स्पष्टपणे सांगितलं की, खरा धोका सोन्यात नसून पत बाजारात आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे, कर्जावर आधारित गुंतवणूक टाळावी लागणार आहे. तसंच प्रत्यक्ष सोने बाळगणे हा एक अधिक सुरक्षित पर्याय भविष्यात असणार आहे.