जगातील 5 सर्वात कठीण परीक्षा, ज्यात मोठं मोठे बुद्धिमानही होतात नापास
Toughest Exams : तुम्हाला जगातील अशा 5 सर्वात कठीण परीक्षांविषयी सांगणार आहोत ज्या पास करणं अनेक बुद्धिमान लोकांना देखील जमत नाही. ही केवळ उमेदवाराच्या बुद्धिमत्तेची नाही तर संयम आणि जिद्दीची सुद्धा परीक्षा असते.
Toughest Exams : जगातील सर्वात कठीण परीक्षा या केवळ अभ्यासच नाही तर स्टेटर्जी, टाइम मॅनेजमेंट, मेंटल प्रेशरशी लढून सुद्धा आपला आत्मविश्वास टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच ज्यांना या परीक्षांमध्ये यश मिळते त्यांना केवळ बुद्धिमानच मानले जात नाही, तर त्यांचा संयम आणि जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. तेव्हा अशा जगातील 5 सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत याविषयी जाणून घेऊयात.
गाओकाओ परीक्षा :
चीनमधील राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी आहे. 2025 मध्ये सुमारे 1 कोटी 33 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. चीनमधील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्रवेशाचे प्रमाण सुमारे 85% आहे आणि 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे.
UPSC सिव्हिल सेवा परीक्षा :
UPSC सिव्हिल सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित प्रशासकीय सेवा परीक्षा आहे. दरवर्षी जवळपास 13 लाख विद्यार्थी या यूपीएससी सीएसईसाठी अप्लिकेशन करतात, मात्र यातील सिलेक्शनची टक्केवारी 0.1 टक्के एवढीच असते. सुमारे 1000 पदांसाठी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात.
जेईई एडवांस्ड :
JEE Main मध्ये पहिल्या 2.5 लाख उमेदवारांच्या यादीत स्थान मिळवणारे उमेदवार JEE Advanced साठी पात्र मानले जातात. IITs आणि इतर नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 2025 मध्ये 1,87,223 अर्ज आले होते, 1,80,422 उमेदवार परीक्षेला बसले होते आणि 54,378 उमेदवार पात्र ठरले. याचा अर्थ यशाचे प्रमाण अंदाजे 30.1% इतके होते.
चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) :
चार्टर्ड अकाउंटन्सीची परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होते ज्यात सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल यांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो उमेदवारांपैकी केवळ काही मोजकेच उमेदवार या परीक्षेत यशस्वी होतात. साधारणपणे सीए (CA) परीक्षेचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. अनेक तरुण या परीक्षेच्या तयारीसाठी आपली अनेक वर्षे खर्ची घालतात.
सीएफए :
चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट ही वित्त क्षेत्रातील एक आंतरराष्ट्रीय परीक्षा आहे. ही परीक्षा अमेरिकेतील एका संस्थेद्वारे आयोजित केली जाते आणि तिची परीक्षा केंद्रे जगभरात आहेत. पहिल्या पातळीसाठी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे 45% आहे. परंतु सेकंड आणि थर्ड लेव्हलपर्यंत याचे प्रमाण कमी होते.