• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /करिअर
  • /महिना ₹9 लाख पगार, उत्तम लाइफस्टाइल अन्... 'या' देशांत भारतीयांना प्रचंड डिमांड; इथं नोकरी मिळवण्यासाठी काय करायचं? A To Z माहिती

महिना ₹9 लाख पगार, उत्तम लाइफस्टाइल अन्... 'या' देशांत भारतीयांना प्रचंड डिमांड; इथं नोकरी मिळवण्यासाठी काय करायचं? A To Z माहिती

परदेशात नोकरीची संधी शोधत असाल तर नेमक्या कोणत्या देशांमध्ये कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांना आहे संधी? तिथे किती पगार मिळतो? परदेशात नोकरी मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागेल? जाणून घ्या ए टू झेड माहिती...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 02, 2026, 10:39 AM IST|Updated: Oct 02, 2026, 11:00 AM IST
joinshare
महिना ₹9 लाख पगार, उत्तम लाइफस्टाइल अन्... 'या' देशांत भारतीयांना प्रचंड डिमांड; इथं नोकरी मिळवण्यासाठी काय करायचं? A To Z माहिती
Image Credit: भारतीय कर्मचाऱ्यांना प्रचंड मागणी असणारे देश आणि तिथे कोणत्या नोकऱ्या आहेत? (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तुम्हीसुद्धा परदेशात जाऊन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर सध्या सुरु असलेला काळ हा सर्वोत्तम आहे. कारण भारतीयांना सध्या जगातील अनेक देशामधून मागणी असून या मोबदल्यात उत्तम पगारही दिला जातोय. भारतीयांसाठी जगातील कोणत्या देशांमध्ये कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत? नक्की या नोकऱ्यांसाठी किती पगार मिळू शकतो यावरच नजर टाकूयात....

कोणत्या देशांमध्ये भारतीयांना नोकरीची संधी?

परदेशात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांसाठी यंदाच्या वर्षी जर्मनी, संयुक्त अरब अमिराती, जपान, सौदी अरेबिया, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, सिंगापूर आणि फिनलंडमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कामांसाठी कुशल भारतीयांची गरज आहे. सदर देशांमध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, अभियांत्रिकी, बांधकाम व वित्त क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

कोणत्या देशात कोणत्या क्षेत्राला मागणी?

जगातील सर्वात प्रगत अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला देश अशी ओळख असलेल्या जर्मनीमध्ये भारतीयांसाठी नोकरीच्या उत्तम संधी आहेत. जर्मनीमध्ये माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, वाहन अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, आरोग्यसेवा आणि हरित ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. इथं नोकरी करण्याची इच्छा असलेल्या भारतीयांसाठी 'ईयू ब्लू कार्ड' आणि 'ऑपॉच्र्युनिटी कार्ड' हे महत्त्वाचे आहेत.

आखाती देशांमध्ये आणि प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये तंत्रज्ञान, बांधकाम, वित्त, हॉटेल व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात भारतीयांची मागणी आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. बांधकाम, सायबर सुरक्षा, आरोग्यसेवा, पेट्रोकेमिकल आणि वाहतूक क्षेत्रात नोकऱ्या आहेत. जपानमध्ये वृद्ध लोकसंख्येमुळे कुशल कर्मचाऱ्यांची गरज असून तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अर्थसंवाहक आणि यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात संधी आहेत. तर ब्रिटनमध्ये आरोग्यसेवा क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ब्रिटनमध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि माहिती विश्लेषण क्षेत्रात संधी आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रासाठी आरोग्य व काळजी कामगार व्हिसा हा महत्त्वाचा मार्ग आहे.

कोणत्या देशात, कुठल्या क्षेत्रात साधारण किती पगार मिळतो...

जर्मनीमध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य नोकरी करणाऱ्या भारतीयांना प्रती महिना 3.80 लाख रुपये ते 6.50 लाख रुपये पगार मिळू शकतो. तसेच संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये तंत्रज्ञान, बांधकाम, वित्त क्षेत्रातील नोकरीसाठी दर महिना 1.15 लाख ते 6.80 लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या आहेत. जपानसारख्या प्रगत देशामध्ये तंत्रज्ञान, रोबोटिक्स, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रती महिना 2.30 लाख रुपये ते 4.20 लाख रुपये पगार भारतीयांना मिळू शकतो.  सौदी अरेबियामध्ये बांधकाम, सायबर सुरक्षा, आरोग्य क्षेत्रात 1.30 लाख रुपये प्रती महिना ते 6.20 लाख रुपये पगार मिळतो. ब्रिटनमध्ये 3.10 लाख ते 6.70 लाख रुपये महिना पगार आरोग्य, तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना मिळू शकतो.

कॅनडासारख्या भारतीयांची संख्या मोठी असलेल्या देशामध्ये आरोग्य, तंत्रज्ञान, कुशल व्यवसाय क्षेत्रात महिना 3.30 लाख ते 5.60 लाख रुपये पगार मिळू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये प्रती महिना, 3.50 लाख ते 6.10 लाख रुपये पगार देणाऱ्या क्षेत्रांचा विचार केला तर बांधकाम, अभियांत्रिकी, आरोग्यविषयक क्षेत्रांचा पर्याय उपलब्ध आहे.  आयर्लंडमध्ये दर महिना 3.50 लाख ते 6.30 लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या तंत्रज्ञान, औषधनिर्मिती क्षेत्रात उपलब्ध आहेत. सिंगापूरमध्ये 3.80 लाख रुपये ते तब्बल 9 लाख प्रती महिना पगाराच्या नोकऱ्या वित्त, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रामध्ये फिनलंडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिना 2.50 लाख ते 4.40 लाख रुपये पगार मिळू शकतो. क्षेत्राची आणि देशाची निवड करताना व्हिसा, पात्रता, भाषा, कर आणि राहणीमानाचा खर्चही लक्षात घेणे आवश्यक, संबंधित देशांमधील नियमांनुसार पात्रता बदलू शकते.

परदेशात नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

परदेशात नोकरी मिळवण्यासाठी वर नमूद केलेल्या आणि त्या त्या देशांमध्ये मागणी असलेल्या क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कामाचा अनुभव मिळवणं फायद्याचं ठरु शकतं.  जर्मन आणि जपानी भाषेचे ज्ञान रोजगाराच्या संधी वाढविण्यास त्या त्या देशांमध्ये वास्तव्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. ठराविक देशांमधील नोकरीसाठी अर्ज करताना त्या देशातील सरकारी खात्यांची अधिकृत वेबसाईट्स तपासत राहा. नोकरी शोधताना सरकारमान्य माध्यमांचाच वापर करा. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या संस्थांची संख्या बरीच आहे. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. कागदपत्रे, शुल्क देण्यापूर्वी संस्थेची विश्वासार्हता निश्चित तपासून पाहा. संस्थेची नोंदणी आणि अधिकृत मान्यता तपासून पुढील निर्णय घ्या. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Career News
Jobs News
Government Jobs