फेस्टिव्हल सीजनमध्ये जॉबचं जॉब, 4 लाखांपेक्षा जास्त रिक्त जागा निघणार, 50 हजारांपर्यंत होणार कमाई
Job Vacancy : सणासुदीच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ईकॉमर्स कंपन्यां लाखोंच्या संख्येने त्यांच्या आस्थापनेतील रिक्त जागा भरणार असून यातून अनेकांच्या हाताला रोजगार मिळेल.
Job Vacancy In Festivales : सणासुदीला सुरुवात होताच देशातील प्रसिद्ध ई कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स सेक्टरमध्ये नोकऱ्यांची जबरदस्त सुरुवात झाली आहे. यावेळी फेस्टिव्हल सेलमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे यंदा रोजगार उपलब्धीचे रेकॉर्ड मोडले जाणार आहेत. स्टाफिंग कंपन्या आणि संबंधित क्षेत्रातील ताज्या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत सुमारे 4,00,000 'गिग' रोजगार निर्माण झाले आहेत आणि वर्षाच्या अखेरीस हा आकडा 7,00,000 चा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे.
स्टाफिंग प्लेटफॉर्म 'टीमलीज सर्व्हिसेस' च्या नुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत, या सणासुदीच्या काळात कामगारांच्या मागणीत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर तुम्हालाही या सणासुदीच्या काळात 'पार्ट-टाइम' काम करून किंवा ई-कॉमर्स क्षेत्रातील बड्या कंपन्यांशी जोडून घेऊन चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर कुठे संधी आहेत आणि त्यासाठी कसा अर्ज करता येईल याविषयी जाणून घ्या.
अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा मेगा प्लॅन :
ई कॉमर्स क्षेत्रातील या दोन दिग्गज कंपन्यांनी आपली डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक्स यंत्रणा हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती मोहीम हाती घेतली आहे. ॲमेझॉन इंडियाने आपल्या परिचालन (ऑपरेशन्स) नेटवर्कमध्ये 1,00,000 हून अधिक हंगामी रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या या नोकऱ्या मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, लखनऊ आणि पुणे यांसारख्या लहान मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत.
फ्लिपकार्टने आपली सप्लाय चेन, वेअरहाऊस, सॉर्टिंग सेंटर्स आणि डिलिव्हरी हब्समध्ये जवळपास 1 लाखांहून अधिक रोजगाराची संधी उपलब्ध केल्या आहेत. मीशो आणि स्नॅपडील सारख्या प्लॅटफॉर्म्सवर, तसेच क्विक-कॉमर्स ॲप्सवर वाढलेल्या ऑर्डर्स हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 'गिग वर्कर्स' ची भरती केली जात आहे.
कोण कोणत्या पदांसाठी नोकरी?
सणासुदीच्या काळात केवळ मालाची डिलिव्हरीच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर बॅकएंड कामेही करावी लागतात. वेअरहाऊसच्या कामकाजामध्ये मालाची पॅकिंग, स्कॅनिंग, लेबलिंग आणि वर्गीकरण करण्यापासून ते शेवटच्या टप्प्यातील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची भरती करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. बाईक, स्कूटर किंवा तीनचाकी वाहनांचा वापर करून ग्राहकांच्या घरी पॅकेजेस पोहोचवणे ही त्यांची भूमिका असते. याव्यतिरिक्त ग्राहक सेवा क्षेत्रातील एका भूमिकेचाही यात समावेश आहे. ज्यामध्ये कॉल आणि चॅटद्वारे ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. तसेच कार्यक्रम आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील सहाय्यासाठी मॉल्स, रिटेल आउटलेट्स आणि डिलिव्हरी हब्समध्ये सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे.
कुठे करायचा अर्ज?
ॲमेझॉनमधील पार्ट टाईम आणि फ्लेक्सिबल नोकऱ्यांसाठी : Amazon Flex India Official Portal
ॲमेझॉनमधील कॉर्पोरेट आणि ग्राहक सेवा पदांसाठी : Amazon Jobs India Official Link
फ्लिपकार्ट सप्लाय चेन आणि वेअरहाऊस नोकऱ्यांसाठी : Flipkart Careers Direct Link