• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /करिअर
  • /गुगलमध्ये 40 हजारांची इंटर्नशिप ते आता वर्षाला 1 कोटींचं पॅकेज; 8 वर्षात कसं पालटलं नशीब?

गुगलमध्ये 40 हजारांची इंटर्नशिप ते आता वर्षाला 1 कोटींचं पॅकेज; 8 वर्षात कसं पालटलं नशीब?

आयआयटी पटना येथून शिक्षण घेतलेल्या सृष्टि श्रेया सिंह यांनी 2019 मध्ये 40 हजार रुपयांच्या गुगल इंटर्नशिपपासून करिअरला सुरुवात केली. 2026 मध्ये अमेरिकेत त्यांची वार्षिक कमाई एक कोटींच्या पुढे गेली. त्यांचा प्रवास जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 28, 2026, 20:53 IST|Updated: Nov 28, 2026, 21:02 IST
joinshare
गुगलमध्ये 40 हजारांची इंटर्नशिप ते आता वर्षाला 1 कोटींचं पॅकेज; 8 वर्षात कसं पालटलं नशीब?
Image Credit: 1 कोटींचं पॅकेज

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

करिअरची सुरुवात छोटी असली तरी योग्य संधी, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर मोठी झेप घेता येते, हे सृष्टि श्रेया सिंह यांच्या प्रवासातून दिसते. आयआयटी पटना येथून पदवी घेतलेल्या सृष्टि यांनी 2019 मध्ये गुगल मधील इंटर्नशिपमधून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 40 हजार रुपये मिळाले होते. पुढे एमबीए, नामांकित कंपन्यांमधील कामाचा अनुभव, नोकरीतील बदल आणि अमेरिकेतील स्टार्टअपमधील संधी अशा टप्प्यांतून त्यांची कमाई वाढत गेली. 2026 मध्ये त्यांची वार्षिक कमाई एक कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला आहे.

गुगलमध्ये 40 हजारांची इंटर्नशिप

सृष्टि यांनी 2019 मध्ये गुगलमध्ये इंटर्नशिप केली. या कामातून त्यांना 40 हजार रुपये मिळाले. 2020 मध्ये त्यांनी आणखी दोन इंटर्नशिप केल्या. या दोन्ही संधींमधून त्या वर्षात त्यांची एकूण कमाई 60 हजार रुपये झाली. शिक्षण घेत असतानाच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे पदवी पूर्ण होण्याआधीच त्यांना कॉर्पोरेट क्षेत्राची ओळख झाली.

एमबीएच्या शिक्षणासाठी दीड लाख रुपये

2021 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सृष्टि यांनी एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. याच काळात त्यांना दोन महिने नोकरी करण्याची संधी मिळाली. या कालावधीत त्यांनी दीड लाख रुपये कमावले. विशेष म्हणजे, ही रक्कम त्यांनी एमबीएच्या शिक्षण शुल्कासाठी वापरल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि कामाचा अनुभव यांची सांगड घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता.

महिन्याला 1.6 लाखांचे स्टायपेंड

2022 मध्ये सृष्टि यांना कोलगेट-पामोलिव्ह या कंपनीत इंटर्नशिप मिळाली. या इंटर्नशिपसाठी त्यांना दरमहा 1.6 लाख रुपयांचे स्टायपेंड मिळाले. त्यांनी दोन महिने काम केले आणि या काळात एकूण 3.2 लाख रुपये कमावले. यानंतर एमबीए पूर्ण करून त्यांनी पूर्णवेळ कॉर्पोरेट नोकरीकडे वाटचाल केली.

कमाई 15 लाखांवरून 35 लाखांपर्यंत

जुलै 2023 मध्ये त्यांनी पूर्णवेळ कॉर्पोरेट भूमिकेत काम सुरू केले. वर्षाच्या मध्यावर नोकरी सुरू केल्यामुळे डिसेंबरपर्यंत त्यांची कमाई 15 लाख रुपये झाली. 2024 मध्ये त्यांनी नोकरी बदलली. नवीन कंपनीकडून मिळालेल्या जॉइनिंग बोनससह त्या वर्षातील एकूण कमाई 35 लाख रुपयांवर पोहोचली. 2025 मध्ये ही कमाई 30 लाख रुपये होती. त्या वर्षी मागील वर्षासारखा जॉइनिंग बोनस मिळाला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कमाई एक कोटींच्या पुढे

2026 मध्ये सृष्टि यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे एका चांगल्या आर्थिक पाठबळ असलेल्या स्टार्टअपमध्ये ग्रोथ आणि मार्केटिंग क्षेत्रातील भूमिका स्वीकारली. या बदलानंतर त्यांची वार्षिक कमाई एक कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या व्यावसायिक प्रवासात गुगल, असेंचर आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jobs News
Career News