SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बीएमसीमधील कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा, मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारांच्या बाजूने दिला निकाल

Career News : मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेवरील न्यायालयीन अडथळा दूर झाला आहे. अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. असून यामुळे उमेदवारांना नक्कीच दिलासा मिळालेला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 01, 2026, 09:04 AM IST | Updated: Oct 01, 2026, 09:38 AM IST
Join

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत स्थापत्य तसेच यांत्रिकी आणि विद्युत कनिष्ठ अभियंता या पदांसाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन वर्षांपासून संबंधित पदांसाठी रखडलेला निकाल जाहीर करण्याचा अडथळा आता दूर झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेवरील न्यायालयीन अडथळा दूर झाला आहे. अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.

2024 या वर्षात मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरतीची जाहिरात काढली होती. त्यानंतर पदवीधर उमेदवारांच्या पात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता. या प्रकरणामुळे आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दोन वर्षांपासून राखून ठेवण्यात दोन वर्षांपासून प्रतीक्षा न्यायालयाने निकाल दिल्यामुळे आता आयबीपीएस संस्थेकडून घेण्यात आलेला निकाल जाहीर करण्याची मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

कनिष्ठ अभियंता पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा प्राप्त झालेला निकाल हा मुंबई महापालिकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावा आणि मागील  दोन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. या सगळ्यात न्यायालयीन प्रक्रियेमुळे परीक्षा देऊनही निकालासाठी उमेदवारांना मोठ्या कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागली. न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आता निकाल जाहीर करून पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता भरती प्रक्रियेतील न्यायालयीन अडथळा दूर झाला असल्याने कनिष्ठ अभियंता पदावरील अभियंता पदविकाधारक उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES