झुकेगा नही साला! जलसा बंगल्यावर बॉम्ब हल्ल्याच्या धमकीनंतरही फॅन्सना भेटले अमिताभ बच्चन
Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला मिळालेल्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. मात्र तरीही या धमक्यांना न घाबरता अमिताभ बच्चन हे नेहमी प्रमाणे रविवारी आपल्या फॅन्सना अभिवादन करण्यासाठी भेटले.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी शुक्रवारी इमेल द्वारे देण्यात आली होती. टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं, त्यांनाच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला मिळालेल्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. मात्र या सगळ्यानंतर सुद्धा अमिताभ बच्चनने फॅन्सना दिलेलं वाचन पूर्ण केलं. अमिताभ बच्चन हे रविवारी जलसा बंगल्याच्या गेटवर फॅन्सना भेटले. धमकी मिळालेली असताना सुद्धा अमिताभ बच्चन यांनी निर्भय शैलीत चाहत्यांची भेट घेतली.
दर रविवारी अमिताभ बच्चन जुहू येथील आपल्या 'जलसा' या निवासस्थानी चाहत्यांची भेट घेतात. त्यांना पाहण्यासाठी दूरदूरवरून लोकांची मोठी गर्दी तेथे जमते. जलसावर बॉम्बने हल्ला करून तो उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर, अशी शक्यता वर्तवली जात होती की कदाचित 'बिग बी' हे रविवारचे भेटीचे सत्र रद्द करतील. मात्र तसे घडले नाही त्यांनी आपल्या चाहत्यांना दिलेले वचन पाळले आणि रविवार 25 ऑक्टोबर 2026 रोजी ते नेहमीच्या उत्साहाने आणि निर्भयपणे चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आले.
मिळाला होता धमकीचा मेल :
मुंबईच्या महापौर कार्यालय, अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, मुंबईतील काही शाळा इत्यादी बॉम्बने उडवुन देण्याची धमकी देण्यात आलेली होती. शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या या ईमेलमध्ये 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणांना लक्ष्य करण्याचा उल्लेख आहे. या ईमेलमध्ये वांद्रे येथील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या निवासस्थानावर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. त्यात 1984 च्या शीख नरसंहाराचा संदर्भ देत 'रक्ताचा बदला रक्त' असा उल्लेख करण्यात आला होता.
तो Video होतोय व्हायरल :
84 वर्षीय अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते रविवारी नेहमी प्रमाणे जलसा बंगल्याच्या बाहेर येऊन फॅन्सना अभिवादन करत आहेत. त्यांनी यावेळी पिंक कॅप आणि जॅकेट घातलं होतं. तसेच अमिताभ यांना अत्यंत उत्साहाने पायऱ्या चढताना आणि आपल्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन करताना पाहिले जाऊ शकते. मात्र 'जलसा'मधील सुरक्षा व्यवस्था नेहमीपेक्षा अधिक कडक असल्याचे दिसून येत आले. अमिताभ बच्चन यांच्या या कृतीचे चाहते कौतुक केले जात आहे.