SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

काँटे,'शूटआउट अ‍ॅट वडाळा'च्या दिग्दर्शकाचं निधन; घरात पाय घसरुन पडले अन्...; नेमकं घडलं काय?

बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे.

Reported By Neha Chaudhari Written By Neha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 02:14 PM IST | Updated: Oct 31, 2026, 02:29 PM IST
Image Credit: Sanjay Gupta passes away
Join

नाना पाटेकर यांच्या निधनातून चित्रपटसृष्टी अजून सावरली नाही, तेच अजून एक धक्कादायक बातमी बॉलिवूडमधून आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालंय.  'कांटे', 'शूटआउट ॲट वडाला' आणि 'काबिल' अशी गाजलेली चित्रपट तर  ऐश्वर्या रायपासून ते हृतिक रोशनपर्यंतच्या प्रत्येकासोबत काम करणारा हा दिग्दर्शक अचानक निघून गेला.

नेमकं काय घडलं, कसा झाला मृत्यू?

मिळालेल्या माहितीनुसार राहत्या घरात संजय गुप्ता काल मध्यरात्री बाथरूममध्ये घरात पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना मध्यरात्री 2.30 वाजता आहे. मध्यरात्रीची वेळ असल्याने घरात सगळे झोपले होते. खरंतर घरात पत्नी, दोन मुलं आणि कामवाली होती. पण ते सगळे झोपले होते, त्यामुळे या घटनेबद्दल काही कळलं नाही.

 

 

 त्यासोबत संजय गुप्ता यांना तात्काळ मदत न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याच सांगण्यात येतंय. वर्सोवा पोलीस ठाणे कडून आकस्मित मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे. 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES