'अत्यंत उर्मट...'; दीया मिर्झाचे नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याच्यासोबत काम करणे म्हणजे...'
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा हिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने एक पोस्ट केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये तिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीनला बोलण्याचीही शिस्त नाही, त्याच्यासोबत काम करणे हे एखाद्या घाणेरड्या स्वप्नासारखे आहे, असं दीयाने म्हटलं आहे. दीयाच्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री दीया मिर्झाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीवर केलेल्या आरोपांमुळं कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्याच्यासोबत काम करणे म्हणजे एका घाणेरड्या स्वप्नासारखे आहे. त्याला बोलण्याचीही शिस्त नाही. तर त्याचा अॅटिट्युडही वेगळ्याच लेव्हलला आहे. अत्यंत उर्मट व्यक्ती आहे. दीयाने या पोस्टमध्ये नवाजुद्दीनला टॅगदेखील केलं आहे.
दीया मिर्झाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अवघ्या काही मिनिटांतच तिच्या पोस्टवर शंभरहून अधिक जणांच्या कमेंट आल्या आहेत. काहींनी हा पीआर स्टंट असून नवाज आणि दीया एका प्रोजेक्टवर काम करत असणार, असं म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं आहे की, प्रमोशन सुरू आहे. नवाज हा खूप चांगला व्यक्ती आहे.
दीयाच्या पोस्टनंतर काहींनी तिला ट्रोल करायलादेखील सुरुवात केली आहे. तो तुझ्यासारखा नाहीये, अशी कमेंट एकाने केली आहे. तर, एकाने त्याने करवाचौथ आणि दिवाळी साजरी करु नका, असं तरी म्हटलं नाहीये अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, दीयाच्या स्टेटसनंतर चर्चा रंगली आहे की सेक्रेड गेम्सच्या तिसरा सिझनची. गणेश गायतोंडे पुन्हा येतोय का? असा सवाल नेटकरी करत आहेत. तर एका युजरने हिंट देत म्हटलंय की, तिने कॅरेटक्टर असं म्हटलंय त्यातच समजून जा की हे वेबसिरीज किंवा चित्रपटाचे प्रमोशन आहे. दीयाच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय हे मात्र कळू शकले नाहीये. खरंच दीया आणि नवाजमध्ये काही वाद झालाय का? की हा कोणता पीआर स्टंट आहे, याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.