Aaron Vicky Thomas : नवी मुंबईतील एका तरुणाने एकाच दिवसात तीन रोल्स-रॉइस कार विकत घेतल्या आहेत. या 3 कारची एकत्रित किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील. या तरुणाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ही डिलिव्हरी भारतातील एका दिवसातील सर्वात महागडी कार डिलिव्हरी म्हणून ओळखली जात आहे.
ॲरॉन विकी थॉमस असे या तरुणाचे नाव आहे. ॲरॉन विकी थॉमस याने एक रोल्स रॉयस फँटम आणि दोन रोल्स रॉयस कलिनन सिरीज-2 अशा 3 महागड्या कार खरेदी केल्या आहेत. या तिनही कारची एकूण किंमत 50 कोटी आहे. फँटम कारवर ‘स्पिरिट ऑफ एक्स्टसी’ लोगो हा. हा लोगो सोन्याचा आहे. या कारवर हे चिन्ह चांदीच्या किंवा क्रोम रंगात असते. पण ॲरॉन खरेदी केलेल्या कारवर सोन्याच लोगो आहे.
ही भारतातील सर्वाधिक महागडी फँटम असल्याचा दावाही करण्यात आला आहे.या कारचे इंटेरियर देखील तितकेच महाग आहे. इंटेरियरच्या खर्चात 10-12 कार खरेदी करता येतील. ॲरॉन याने खरेदी केलेल्या कलिनन सिरीज-2 या प्रकारातील कार ही रोल्स रॉयसची आलिशान एसयूव्ही आहे. या कारमध्ये 6.75 लिटर क्षमतेचे ट्विन टर्बो व्ही-12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 571 हॉर्सपावर आणि 850 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. भारतात या कारची किंमत 10 कोटीपेंक्षा जास्त आहे. जर ग्राहकांनी यात काही बदल केले तर यासाठी जादा पैसे मोजावे लागतात.
ॲरॉन विकी थॉमस याचे कुटुंब नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायात आहे. त्यांची ईव्ही होम्स कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी आहे. वाशी, कोपरखैरणे यांसह नवी मुंबईतील अनेक परिसरात यांचे गृहनिर्माण प्रोजेक्ट आहेत. या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, कंपनीच्या वेबसाईवर या कंपनीच्या प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार कंपनीची आर्थिक उलाढाल अनेक कोटींची असू शकते.