• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

बीसीसीआयने इमर्जिंग आशिया कप 2026 साठी एक मजबूत संघ पाठवला आहे. भारताचा संघ पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळणार या सामन्यामध्ये भारतीय संघाचा प्लेइंग 11 कशी असणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 21:51 IST|Updated: Nov 18, 2026, 22:12 IST
joinshare
इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एकिकडे भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे तर भारताचा अ संघ इमर्जिंग आशिया कप 2026 खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. इमर्जिंग आशिया कप 2026 टीम इंडिया तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत, बीसीसीआयने इमर्जिंग आशिया कप 2026 साठी एक मजबूत संघ पाठवला आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेंडगे, तनुष कोटीयान यांसारखे मजबूत खेळाडूंचा संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत अ संघ ग्रुप अ मध्ये तीन सामने खेळणार आहे, भारताचा संघ पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळणार या सामन्यामध्ये भारतीय संघाचा प्लेइंग 11 कशी असणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

इमर्जिंग आशिया कप 2026 ही स्पर्धा एकदिवसीय म्हणजेच 50 ओव्हरच्या फॅारमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. भारताच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा टी20 संघातील स्टार अभिषेक शर्माचे स्थान पक्के असेल. या स्पर्धेमध्ये अभिषेक शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असणार आहे. तर त्याच्या जोडीला वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. सूर्यवंशी, जो सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही स्वतःला सिद्ध करू पाहत आहे, त्याने टी-२० संघात स्वतःला सिद्ध केले आहे. वैभवदेखील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल.

हे ही वाचा

धक्कादायक! ग्रीनच्या तोंडावर चेंडू लागला अन् मैदानावर कोसळला; तोंडातून रक्त येताच सोडले मैदान

आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळणारा प्रभसिमरण सिंगला विकेटकिपर म्हणून संधी दिली जाऊ शकते. भारत अ संघासाठी प्रभसिमरनने चांगली कामगिरी केली आहे, टीम इंडियाचा कर्णधार तिलक वर्मा हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. पकर्णधार रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर खेळेल. रिंकू सिंग चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून त्याचे संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. आयुष बडोनीला सहाव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. शहबाज अहमदला फिरकी अष्टपैलू म्हणून खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. संघ व्यवस्थापन सध्या विप्रज निगमपेक्षा त्याला प्राधान्य देऊ शकते. हर्ष दुबेलाही अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकते.

तनुष कोटियनलाही सध्या बेंचवरच बसावे लागू शकते. अर्शद खानला वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून संधी मिळू शकते. अर्शद खानने भारत 'अ' संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हर्षित राणालाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजी विभागात प्रिन्स यादवही दिसेल, जो एकदिवसीय सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे.

भारतीय अ संघाची संभाव्य प्लेइंग 11

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), आयुष बदोनी, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, अरशद खान, हर्षित राणा, प्रिंस यादव

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Vaibhav Sooryavanshi
Team india