• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले आहेत. या नंबरप्लेटची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 18, 2026, 23:52 IST|Updated: Nov 18, 2026, 23:53 IST
joinshare
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर : हौसेला मोल नसतं म्हणतात. पण कोल्हापूरकरांच्या हौसेला तर किंमतच नाही. गाडी कोणतीही असू दे, नंबर मात्र रुबाबातच पाहिजे. मग त्यासाठी खिशातून लाखो रुपये गेले तरी चालतील. अशाच हौशी कोल्हापूरकरांनी फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजलेत. विशेष म्हणजे फॅन्सी नंबरमधून सरकारी तिजोरी भरण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.

जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे उगाच म्हणत नाहीत. खाण्यापिण्यापासून ते राहणीमानापर्यंत आणि वाहनाच्या निवडीपासून ते वाहनाच्या नंबरपर्यंत. प्रत्येक गोष्टीत आपला एक वेगळाच रुबाब असला पाहिजे, हा अस्सल कोल्हापुरी बाणा. दारात कार आली की तिची काळजी पोटच्या पोरासारखी घ्यायची आणि नंबर घ्यायचा तर असा घ्यायचा की रस्त्यावरून जाताना सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या पाहिजेत. मग तो दुचाकीचा असो, चारचाकीचा असो, ट्रॅक्टर असो किंवा इलेक्ट्रिक बाइक. नंबर मात्र फॅन्सीच पाहिजे.  हाच नाद अनेक पिढ्यांपासून चिखली गावातील पिसाळ कुटुंबीयदेखील जपत आहे. प्रसाद पिसाळ याच्या घरात 9890 नंबरची अनेक वाहने आहेत.

यंदा जानेवारीपासून 14 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 18 हजार 578 वाहनधारकांनी आपल्या आवडीच्या नंबरसाठी नोंदणी केलीय. त्यासाठी कोल्हापूरकरांनी मोजलेत तब्बल 19 कोटी 84 लाख 12 हजार रुपये...9595, 0101, 9099, 2700, 9191 असे नंबर मिळवण्यासाठी वाहनधारकांची अक्षरशः चढाओढ सुरू असते.  काहींना जन्मतारीख हवी, काहींना शुभ अंक हवा, तर काहींना अंकांची बेरीज नऊ येणारा नंबर हवा. कोल्हापूर जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे एमएच 09, त्यामुळे गाडी कुठल्याही राज्यात घेऊन जा, नंबर प्लेटवर एमएच 09 दिसलं की आपण कोल्हापूरचे असल्याची ओळख अभिमानानं मिरवता येते आणि हीच ओळख जपण्यासाठी कोल्हापूरकरांची फॅन्सी नंबरसाठीची धडपड सुरू असते...आता हौस करायची तर ती मनापासून. नंबर आवडला की किंमत किती याचा फारसा विचार नाही. अशीच काहीशी कोल्हापुरी मानसिकता या आकड्यांतून समोर येतेय. 

वाहनधारकांची ही हौस पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया राबवली जाते. आवडीचा नंबर मिळवण्यासाठी वाहनधारकांकडून ऑनलाइन नोंदणी आणि नियमानुसार शुल्क भरलं जातं...यंदा अवघ्या साडेदहा महिन्यांत 18 हजार 578 वाहनधारकांनी फॅन्सी नंबर मिळवलेत. यातून आरटीओच्या तिजोरीत तब्बल 19 कोटी 84 लाख 12 हजार रुपयांचा महसूल जमा झालाय... म्हणजे एकीकडे कोल्हापूरकरांची नंबरची हौस भागतेय, तर दुसरीकडे सरकारी तिजोरीही भरतेय. फॅन्सी नंबरच्या या कमाईनं कोल्हापूरनं राज्यात आपला वेगळाच ठसा उमटवलाय.

गाडी कुठलीही असो, नंबर मात्र आपल्या मनासारखाच पाहिजे..त्यासाठी हजारो नाही तर लाखो रुपये मोजायचीही तयारी. हीच तर अस्सल कोल्हापुरी स्टाईल. फॅन्सी नंबरच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जवळपास 20 कोटींची भर घालणाऱ्या कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय, हौसेला मोल नसतं आणि कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड असतो. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
Religion News