टायफॉइड हा एक असा आजार आहे जो तुम्ही जर अंगावर काढत असाल तर तुम्हाला त्याच्या आणखी समस्या होऊ शकतात. टायफॉइड होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, टायफॉइड हा दूषित पाणी प्यायल्याने किंवा दूषित अन्न खाल्ल्याने टायफॉइड तापाचा संसर्ग होतो. जर तुम्ही यावर उपचार नाही केला आणि सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर समस्या देखील उद्धवू शकतात. टायफॉइड झाल्याचे ज्यावेळी आपल्याला समजेल त्यावेळी त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. आता नायटेड किंगडमच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने (National Health Service) टायफॉइडबद्दल माहिती दिली आहे. या लेखामध्ये तुम्हाला आम्ही टायफॉइडची लक्षणे, तो टाळण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
टायफॉइडमुळे तुम्हाला तीव्र ताप जाणवू शकतो, 103-104 अंश फॅरेनहाइटपर्यंत शरीरातील पोहोचू शकतो.
टायफॉइडच्या वेळी शरीरातील ताप हा 3 दिवसांपर्यंत टिकू शकतो.
तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा देखील जाणवू शकतो.
पोटदुखी असू शकते
तुम्हाला थंडी जाणवू शकते आणि अंगदुखी होऊ शकते.
बद्धकोष्ठता किंवा अतिसार ही एक समस्या असू शकते.
खोकला येऊ शकतो
भूक कमी होऊ शकते
बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीरावर सपाट गुलाबी ठिपके दिसू शकतात.
टायफॉइड टाळण्यासाठी चांगली स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शौचालय वापरल्यानंतर आणि स्वयंपाक करण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावा. साबण उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझर वापरा. पूर्णपणे शिजवलेले आणि झाकलेले अन्न खा. अपाश्चरीकृत दुधापासून बनवलेले चीज, दही किंवा आईस्क्रीम खाणे टाळा. न झाकलेले अन्न खाणे टाळा. टायफॉइड झालेल्या व्यक्तीने तयार केलेले किंवा वाढलेले अन्न खाणे टाळा.
हे ही वाचा
टायफॉइड ताप हा एक गंभीर पण उपचार करण्यायोग्य आजार आहे. त्याची लक्षणे लवकर ओळखणे, वैद्यकीय उपचार घेणे आणि चांगली स्वच्छता राखणे हे तो टाळण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. स्वच्छ पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे यामुळे टायफॉइडचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. जर तुम्हाला सतत जास्त ताप किंवा टायफॉइडसारखी लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.