'कधी कपडे गायब तर कधी शरीराचा आकार बदलतो...' 'दृश्यम 3' मधील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या डीपफेक व्हिडिओवर स्पष्टच बोलली!
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित झालेल्या 'छुट्टमल्ले' या गाण्यातील एक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. यावर आता अभिनेत्री श्रिया सरननेही एआय-मॉर्फ केलेल्या प्रतिमांची बळी ठरल्याबद्दल आवाज उठवला आहे.
आजकाल या सोशल मिडियामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोशल मिडियावर व्हायरल होणारे अश्लिल व्हिडिओमुळे अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आता एआयमुळे अनेक मुली त्याचबरोबर सिनेमा सृष्टीतील अनेक अभिनेत्री मागील काही काळापासून सातत्याने डिपफेक व्हिडिओचा बळी ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित झालेल्या 'छुट्टमल्ले' या गाण्यातील एक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये एआयचा वापर करुन अभिनेत्री जान्हवी कपूरची बदनामी करण्यात आली होती त्यानंतर दोन्ही कलाकार संतापले होते.
आता, 'दृश्यम: द कन्क्लुजन' या चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरननेही एआय-मॉर्फ केलेल्या प्रतिमांची बळी ठरल्याबद्दल आवाज उठवला आहे. अभिनेत्री म्हणाली की, हे त्रासदायक आहे आणि कधीकधी फोटोमध्ये आपणच आहोत हे तिच्या लक्षातही येत नाही. अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये भाष्य करुन तिची प्रतिक्रिया शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणाली की, ती एआयच्या गैरवापराची बळी ठरली आहे. तिचे फोटो एडिट करून ऑनलाइन शेअर करण्यात आले आहेत. अभिनेत्रीने न्यूज18 ला दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भाष्य केले.
हे ही वाचा
'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', करण जोहरच्या प्रश्नावर सलमान खानने दिलं उत्तर, म्हणाला 'मी...'
अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हंटली आहे की, हे फारच विचित्र आहे, कधीकधी मला स्वत:लाच कळत नाही या फोटोमध्ये मीच आहे का? फोटोचा वापर करुन एआयमध्ये शरीराचा आकार बदलला जातो. तर कधीकधी तुमचे अंगावरचे कपडे काढले जातात. तर कधी तुमचा शरीराचा एक भाग मोठा दिसत असतो. या गोष्टी फार गांभीर्याने घेण्याऐवजी, त्याकडे थोडे दुर्लक्ष करायला हवे." पण हे सर्व असूनही, ही गोष्ट चिंताजनक आणि पूर्णपणे अन्यायकारक आहे. मला वाटतं की प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत असंच घडतं.
श्रिया सरनच्या 'दृश्यम 3' या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट अजूनही प्रभावी कमाई करत आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला अजय देवगणचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. त्याचे बजेट सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, त्याने जगभरात आपल्या बजेटच्या पाचपट कमाई केली आहे.