ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पत्रकार परिषद घेतली. प्रदीप पूर्णेकर हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर कारवाई करण्यात यावी. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात यावी म्हणून राम पूर्णेकरांसह पूर्णेकर कुटुंबियासह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नौपाडा पोलीस स्टेशनबाहेर मंगळवारी राम पूर्णेकरांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण तापले आहेत. अशातच ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी इशारा दिला आहे की, कायदा हातात घेऊन तपासात अडथळा निर्माण करु नका. जर कायदा हाता घेतला तर कारवाई करण्यात येईल. तसंच माझं ठाणेकरांना विनंती आहे की, लोकांना वेठीस धरता कामा नये, किंवा लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी.
पत्रकार परिषदेत ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले म्हणाले की, आम्हाला 164 चे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. ते जर लवकर झाले तर आपल्या पुरावे कमी बळकटी मिळेल. असा हा एकंदरीत सर्व हा गुन्हाचा तपास आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत सुद्धा प्रॉपर शहानिशा करून जे काही त्यामध्ये पुरावे आहेत त्याचे धागेदोरे त्याची जुळवाजुळून तपासाची दिशा निश्चित होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान साक्षीदारचे नोंद केलेली आहे. त्या ठिकाणी जे पुरावे उपलब्ध झाले त्या सर्व पुराव्याची प्रॉपर सांगड घालून त्या अनुषंगाने हा पुढचा तपास होणार आहे. कोण काय म्हणत यापेक्षा जे महत्त्वाचे पुरावे आहे आणि ते आपल्याला के कन्विक्शनपर्यंत घेऊ शकतील हा आमचा प्रथम प्रयत्न असेल.
राजेंद्र शिंदेंच्या चौकशीबद्दल सांगताना ते म्हणाले की, राजेंद्र शिंदे यांना सुद्धा चौकशीला वारंवार बोलावलं आहे. त्यांची चौकशी तपास अधिकारी आणि तपास प्रमुख यांनी केली आहे. त्याचबरोबर मीनाक्षी शिंदे यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. जे काही तपासामध्ये फॅक्ट निष्पन्न झाले त्या अनुषंगाने इंटरोगेशन चालू आहे. तसंच पुराव्याची जुळवाजुळ होईल त्याप्रमाणे कारवाई होईल.
ते पुढे म्हणाले की प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पाच आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी झाली त्यांच्याकडून जी काही आवश्यक माहिती मिळाली आणि बरीचशी माहिती मिळणे बाकी आहे, त्या अनुषंगाने पुढची कारवाई होईल.