• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /अभिनेत्रीच्या इमारतीला भीषण आग; जुळ्या मुलांसह जीव वाचला, पण जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने अश्रू अनावर

अभिनेत्रीच्या इमारतीला भीषण आग; जुळ्या मुलांसह जीव वाचला, पण जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने अश्रू अनावर

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिच्या मुंबईमधील राहत्या इमारतीमध्ये अचानक भीषण आग लागली आणि या आगीमध्ये सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मिडियावर अभिनेत्री शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 10, 2026, 17:28 IST|Updated: Nov 10, 2026, 18:19 IST
joinshare
अभिनेत्रीच्या इमारतीला भीषण आग; जुळ्या मुलांसह जीव वाचला, पण जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने अश्रू अनावर

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नगरसेवकाच्या मुलाचा भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार, शेतकरी दाम्पत्यासाठी ठरला काळ; थरारक CCTV

नगरसेवकाच्या मुलाचा भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार, शेतकरी दाम्पत्यासाठी ठरला काळ; थरारक CCTV

2

रिटायर कर्मचाऱ्यांना लागली बंपर लॉटरी! व्याजासहित 33.95 लाखांची ग्रॅच्युइटी मिळणार

3

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

4

हर्षित राणा पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला, पंचाना करावा लागला हस्तक्षेप! पहा Video

5

15 वर्षांपूर्वी दुसरं लग्न; मुलगा, सून, मुलगी यांनी...; नाशिकमधील RTO अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! पत्नी म्हणाली,'ती शेवटची तारीख...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती अभिनेता विवेक दहियाच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री मुंबईमधील तिच्या राहत्या इमारतीमध्ये अचानक भीषण आग लागली आणि या आगीमध्ये सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मिडियावर अभिनेत्री शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री दिव्यांकाने सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली यामध्ये तिने व्हिडिओ देखील शेअर केला आहे आणि आपले मन मोकळे केले आहे. नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

सोशल मिडियावर दिव्यांकाने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या इमारतीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. तिच्या इमारतीला लागलेल्या आगीने लोकांना धक्का बसला आहे. दिलासादायक बाब म्हणजे अभिनेत्री आणि तिचे कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावले. मात्र, त्या रक्षकाच्या मृत्यूमुळे तिचे मन खचले आहे. दिव्यांकाने त्या रक्षकासोबतचा स्वतःचा एक अविस्मरणीय व्हिडिओ शेअर करून आपले दुःख व्यक्त केले. त्या पोस्टमध्ये तिने नमूद केले आहे की, जेव्हा ती तिच्या जुळ्या मुलांना पहिल्यांदा रुग्णालयातून घरी घेऊन आली होती, तेव्हा त्याच रक्षकाने त्यांना आशीर्वाद दिला होता. दिव्यांकाने त्या रात्री घडलेल्या घटनेचा सविस्तर तपशीलही दिला आहे.

हे ही वाचा

'आम्ही मुंबई इंडियन्ससोबत...' अर्शदीपच्या वडिलांच्या वक्तव्याने ट्रेडवर शिक्कामोर्तब! पहा Video

पुढे अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहीले आहे की, दिवाळीच्या आदल्या रात्री आणि विवेकच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली होती. त्या संध्याकाळी आम्ही बाहेर जायचे ठरवले होचे पण काही ना काही कारणांमुळे ते बेत पुढे ढकलले जात होते. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा आम्ही घरीच होतो. पण आम्हाला वेळेवर धोका लक्षात आला आणि आम्ही आमच्या मुलांसह, कुटुंबासह आणि कर्मचाऱ्यांसह सुरक्षितपणे बाहेर पडलो." काही काळ आम्हाला वाटले की हा फक्त एक अपघात आहे, त्यामुळे फक्त आमच्या काही वस्तूंचे नुकसान झाले असेल. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

पण नंतर आम्हाला कळलं की त्या अपघातात आम्ही धनपत काकांना गमावलं होतं. विवेक आणि मला यावर विश्वासच बसत नव्हता. हे खरं नसावं, अशी आम्ही सतत प्रार्थना करत होतो. जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहताना दिव्यांकाने लिहिले, "धनपत काका, तुम्ही केवळ आमच्या इमारतीचे रक्षक नव्हतात. तुम्ही आमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग होता. एक अशी व्यक्ती ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, एक अशी व्यक्ती जी आमच्या मुलांच्या भविष्याचा एक भाग असेल असे आम्हाला वाटले." तिने शेवटी म्हटले की, जेव्हा त्यांची मुले मोठी होतील, तेव्हा ती आणि विवेक त्यांना त्या दयाळू माणसाविषयी सांगतील, ज्यांनी आशीर्वाद देऊन त्यांचे घरी स्वागत केले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Marathi News
News in Marathi