• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'आई रुग्णालयात होती, तेव्हा फोन करायचे...,' नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पाकिस्तानी माजी खेळाडूने केला मोठा खुलासा!

'आई रुग्णालयात होती, तेव्हा फोन करायचे...,' नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पाकिस्तानी माजी खेळाडूने केला मोठा खुलासा!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने आता नाना पाटेकर यांच्या विधनानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्याने काही खुलासे केले आहेत. नक्की काय म्हणाला पाकिस्तानचा माजी खेळाडू यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 09, 2026, 05:19 PM IST|Updated: Oct 09, 2026, 05:41 PM IST
joinshare
'आई रुग्णालयात होती, तेव्हा फोन करायचे...,' नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पाकिस्तानी माजी खेळाडूने केला मोठा खुलासा!

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला, भारतामध्ये तर त्याच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 75व्या वर्षी नानांचे निधन झाले. पाकिस्तानच्या माजी खेळाडूने आता नाना पाटेकर यांच्या विधनानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्याने काही खुलासे केले आहेत. नक्की काय म्हणाला पाकिस्तानचा माजी खेळाडू यासंदर्भात सविस्तर वाचा.

पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्यांनी नाना पाटेकर आणि त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. एका व्हिडिओ संदेशात, बासित अली यांनी नाना पाटेकर यांना एक प्रिय भाऊ, एक सच्चा मित्र आणि एक जिवंत दंतकथा म्हणून स्मरले. पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलनेही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक फोटो शेअर करत उमरने लिहिले की, त्यांचे कार्य पूर्ण झाले आहे, परंतु त्यांचा प्रभाव पिढ्यानपिढ्या जाणवत राहील. सर, तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल असे माजी खेळाडू म्हणाला.

75 वर्षीय नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या पथकाने सुमारे 45 मिनिटे ते एक तास सीपीआर आणि इतर जीव वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांचे चाहते हादरले आहेत. नाना पाटेकर यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना बासित अलीने सांगितले की, नाना पडद्यावर जितके कणखर आणि खंबीर दिसत होते, तितकेच ते खऱ्या आयुष्यातही प्रेमळ आणि दयाळू होते.

 

Former Pakistan cricketer Basit Ali’s emotional tribute to Nana Patekar is a beautiful reminder of a friendship that transcended borders. He recalled how the Bollywood legend stayed in touch for decades, checked on his mother during her illness, and reached out after Basit’s own heart surgery. Beyond the screen, Basit remembered Nana as a warm, caring and genuinely good human being. His words also showed just how deeply Nana Patekar was admired in Pakistan. Some artists belong to everyone. Nana Patekar was loved equally on both sides of the border.

— Brutal Truth (@sarkarstix) October 8, 2026

 

या दोघांमधील संवाद 2019 साली सुरू झाला, जो हळूहळू एका घनिष्ठ नात्यात बदलला. बासित अलीने सांगितले की, जेव्हा त्याच्या आईला रुग्णालयात दाखल केले होते, तेव्हा नाना पाटेकर दर आठवड्याला फोन करायचे. ते केवळ त्यांच्या तब्येतीची चौकशीच करत नसत, तर त्यांच्या आईशी सविस्तर बोलायचे, त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि त्यांच्या जुन्या आठवणी सांगायचे. आईच्या निधनानंतरही, नानांनी बासित अलीला फोन करून स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sports News
Marathi News
Entertainment News