SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'रणबीर आणि मी एकाच शाळेत'; कपूर आणि कोठारे कुटुंबाचे जुनं नाते, आदिनाथने सांगितला 'तो' किस्सा

आदिनाथ कोठारे रामायण सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो चित्रपटात भरत ही भूमिका साकारत आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 10:26 IST | Updated: Nov 13, 2026, 10:28 IST
Image Credit: adinath kothare shares special bond with ranbir kapoor
Join

रणबीर कपूरचा रामायण सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. रामायण सिनेमात मराठमोळा कलाकार आदिनाथ कोठारे याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आदिनाथ भरत ही भूमिका साकारतोय. अलीकजेच आदिनाथने त्याच्या आणि रणबीरच्या मैत्रीबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. रणबीर आणि आदिनाथ एकाच शाळेत असून तो मला सिनियर होता, अशी आठवण आदिनाथने सांगितली आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारेने रणबीर कपूरसोबतच्या त्यांच्या शाळेतील दिवसांबद्दल खुलासा केला आहे. एकाच इमारतीत राहत असताना ते दोघे कसे एकत्र क्रिकेट खेळायचे, या आठवणींना देखील त्याने उजाळा दिला. आयएएनएसशी बोलताना, त्यांनी त्यांच्या कुटुंबांमधील एक रंजक किस्साही शेअर केला आहे. त्यांचे महेश कोठारे एकेकाळी पडद्यावर नीतू सिंग यांच्या भावाची भूमिका साकारत होते, असेही त्याने सांगितले.

आदिनाथने सांगितले की, "रणबीर शाळेत माझा सिनियर होता. आम्ही एकाच इमारतीत राहायचो आणि एकत्र क्रिकेट खेळायचो. मला आठवतंय, एकदा शाळेत विनय गांधींनी माझी रणबीरशी ओळख करून दिली होती."

आदिनाथने 'रामायण'मधील त्याच्या भूमिकेशी असलेल्या संबंधाबद्दलही खुलासा केला आहे, "माझे वडील लहानपणी बालकलाकार होते. त्यांनी 'घर घर की कहानी'मध्ये नीतू सिंग यांच्या भावाची भूमिका साकारली होती. आणि आता 'रामायण'मध्ये मी रणबीरच्या भावाची भूमिका साकारत आहे. हा केवढा मोठा योगायोग आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

नमित मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात आदिनाथ कोठारेने प्रभू रामाचे धाकटे बंधू भरत यांची भूमिका साकारली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण: भाग 1' हा चित्रपट,  वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथ रामायणावर आधारित आहे.

रामायण दोन भागांत प्रदर्षित होणार असून पहिल्या भागात यात प्रभू रामाच्या बालपणापासून ते त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासापर्यंतचे जीवन चित्रित केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू राम, साई पल्लवीने सीता आणि यशने रावण यांची भूमिका साकारली आहे.

रणबीर कपूरचा 'रामायण'  चित्रपट वीकडेलाही चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी 70.65 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, दुसऱ्या गुरुवारी, म्हणजेच आठव्या दिवशी, त्याच्या कमाईत घट झाली असली तरीही 50 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाची भारतातील 8 दिवसांनंतरची कमाई आता 564.60 कोटी रुपये झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES