विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर : राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चात सुद्धा राज्य सरकारने कपात केलेली आहे त्याबाबतचे निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांना घ्यायला सांगण्यात आले मात्र या सगळ्यात छत्रपती संभाजी नगर मनपापमध्ये काही वेगळच सुरू आहे, दुष्काळाच्या या गडदछायेत छत्रपती संभाजी नगरच्या 36 महिला नगरसेवकांचा दहा दिवसांचा अभ्यास दौरा केरळला जाणार आहे, आता हा अभ्यास दौरा की पर्यटन आणि ऐन दुष्काळाच्या छायेत का असा सवाल केल्या जातोय.
छत्रपती संभाजी नगर महापालिका, या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताचीच, अनेकदा तर पगार करायला पैशांची अडचण त्यात अनेक कामांची बिल वर्षानुवर्षे थकलेली त्यातही ऐन दुष्काळात या महापालिकेच्या 36 नगरसेविका महिला आणि बालकल्याण विभाग अंतर्गत केरळमच्या अभ्यास दौऱ्याला जात आहेत, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी राबवत असलेल्या योजनांच्या पाहणी साठी महिला नगरसेवकांची ही टीम, तिरुअनंतपुरम, कोझी कोड, कोची, कोल्लम थिसुर, आणि कन्नूर ला भेट देण्यासाठी जाताय, या दौर्यावरून आता नवे वादंग निर्माण झाले आहे, दुष्काळात अनावश्यक खर्चावर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत मग हा दौरा कुठल्या निकषात बसतो असा सवाल केल्या जातोय, महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी दौरा आहे ही सर्व प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहेत इथंच नक्की जाऊन काय अभ्यास करणार असा सवाल केल्या जातोय.
महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा तर नगरसेवकांनी एक महिन्याच्या त्यांचा पगार राज्य सरकारच्या दुष्काळ निधीला दिला होता मग दुष्काळाची इतकी जाणीव असतानाही दुष्काळी वेळेतच या 35 लाखांची उधळपट्टी कशाला असा सवाल केला जातोय. विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने यावर सवाल उपस्थित केले आहे आणि भाजप शिवसेनेच्या महिला नगरसेवकांना पर्यटन घडवून आणण्यासाठीच या दौऱ्याचा आयोजन केल्याचा त्यांचा आरोप आहे आणि हा दौरा रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या उधळपट्टीबाबत महापालिका आयुक्तांना जाब विचारणार असल्याचेही एमआयएमचा म्हणणं आहे.
आता विरोधकांनी आवाज उठवल्यावर सत्ताधाऱ्यांची सारवासारव सुरू झाली आहे दुष्काळ पडण्याच्या आधीच दौऱ्याचा नियोजन केलं आहे आणि हा अभ्यास दौरा आहे त्यामुळे जायला काही हरकत नाही असे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा यावर म्हणणे आहे.
सर्व 36 नगरसेविकांचा विमान प्रवास राहण्यासाठी आलिशान हॉटेल फिरण्यासाठी उत्तम गाड्या असा हा दौरा असणार आहे , याचा सर्व खर्च महापालिकेच्या तिजोरीतून होणार आहे. अभ्यास दौऱ्याला हरकत नाही मात्र दुष्काळी परिस्थितीत विकासाच्या मूलभूत कामांनाही स्थगिती मिळण्याची वेळ आली आहे त्यात ज्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनी अशी उधळपट्टी करावी का असा सवाल केल्या जातोय. आता यावर लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल.