• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

प्रभादेवीतील संत रोहिदास रहिवासी संघ परिसरातील 102 रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला. रहिवाशांच्या विरोधानंतर पश्चिम रेल्वेची तोडक कारवाई थांबली. पुनर्वसनाबाबत पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 20, 2026, 14:01 IST|Updated: Nov 20, 2026, 14:15 IST
joinshare
'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा
Image Credit: एकनाथ शिंदे कॉल

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

2

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

3

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

4

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

5

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गेल्या 50 ते 70 वर्षांपासून प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असतानाच त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. प्रभादेवी पश्चिमेकडील संत रोहिदास रहिवासी संघाच्या परिसरातील रेल्वेच्या जागेवरील बांधकामांवर पश्चिम रेल्वेकडून तोडक कारवाई केली जाणार होती. मात्र रहिवाशांनी तीव्र विरोध केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई थांबवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवर चर्चा केली. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

प्रभादेवीत 102 रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ

प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील दक्षिण भागात चाळ क्रमांक 32-एल आणि 33-एल परिसरात रेल्वेच्या जागेवर बांधकामे आहेत. या ठिकाणी सुमारे 100 बांधकामे हटवण्याचे नियोजन होते. दोन चाळी आणि काही तळमजल्यावरील खोल्यांमधील एकूण 102 रहिवाशांना या कारवाईचा फटका बसण्याची शक्यता होती. रेल्वेला ही जागा कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी हवी आहे.

19 आणि 20 नोव्हेंबरला कारवाईचे नियोजन

पश्चिम रेल्वेने 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याचे नियोजन केले होते. या प्रकरणातील निष्कासनाची प्रक्रिया फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाली होती. सुनावण्या आणि युक्तिवादानंतर 12 ऑक्टोबर 2026 रोजी रेल्वेच्या इस्टेट अधिकाऱ्यांनी निष्कासनाचे आदेश दिले. 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान संबंधितांना आदेश बजावण्यात आले. त्यानंतर 14 नोव्हेंबरला कारवाईच्या तारखेबाबत नोटीस लावण्यात आली होती.

'पुनर्वसन झाल्याशिवाय जागा सोडणार नाही'

या परिसरात अनेक कुटुंबे 50 ते 60 वर्षांपासून राहत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. काही कुटुंबांचा येथे सात दशकांपासून वास्तव्य आहे. 1995 पासूनचे वास्तव्य दर्शवणारे पुरावे असल्याचे सांगत पुनर्वसनाची मागणी रहिवाशांनी केली आहे. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या असताना अचानक घर सोडण्याची वेळ आल्यास काय करायचे, असा सवाल महिलांनी उपस्थित केला. केवळ तोंडी आश्वासन नको, तर कारवाई स्थगित केल्याचे लेखी आदेश द्यावेत, अशीही त्यांची मागणी आहे.

एकनाथ शिंदेंचा रेल्वेमंत्र्यांना फोन 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून रहिवाशांच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. आमदार अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडूनही प्रशासनाशी चर्चा सुरू होती. अजय चौधरी यांनी कारवाई थांबवण्यात आल्याचे सांगत ही लढाई संपलेली नसल्याचे स्पष्ट केले. सर्वपक्षीय आमदारांना सोबत घेऊन अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुनर्वसनाचा प्रश्न कायम

20 नोव्हेंबर रोजी जेसीबी यंत्रसामग्री घटनास्थळी आल्यानंतर रहिवाशांनी रस्त्यावर बसून आणि यंत्रांसमोर आडवे होऊन विरोध केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला कारवाई थांबवावी लागली. आता पुढील आठवड्यात बैठक घेऊन पुनर्वसन आणि पर्यायी निवासाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.रेल्वेच्या जागेवरील बांधकामे हटवण्याची प्रक्रिया कायमची रद्द झालेली नाही. रहिवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी, पुनर्वसनासाठी पात्रता आणि पर्यायी घरांबाबत ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे प्रभादेवीतील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Eknath Shinde
Marathi News
Marathi Batmya