SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

करीना कपूर वादात! काँग्रेसने नेत्याने बजावली कायदेशीर नोटिस, 200 वर्ष जुन्या नेकलेसमुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा वादात अडकली असून दिवाळीच्या लूकमध्ये पवित्र कुराणमधील 'आयत-अल-कुर्सी' कोरलेले ऐतिहासिक पेंडंट परिधान केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 12, 2026, 08:05 IST | Updated: Nov 12, 2026, 08:08 IST
Image Credit: Kareena Kapoor gets legal notice from Congress leader over royal pendant
Join

बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खान एका सोशल मीडियावरील पोस्टमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भोपाळ येथील काँग्रेसचे नेते अब्बास हफीज यांनी करीना कपूर आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूरला कायदेशीर नोटीस बजावली आहे. करिनाने दिवाळीनिमित्त परिधान केलेल्या गळ्यातील पेंडेंटवर हफीज यांनी आक्षेप घेतला आहे. तसंच, या पेंडेंटमुळं त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अब्बास हफीज यांनी म्हटलं आहे की, करीन कपूरने दिवाळीदरम्यान सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. त्यात तीने भोपाळ संस्थानाच्या राण्यांच्या ऐतिहासिक वारश्यासी जोडले गेलेले एक पेंडेंट परिधान केले होते. हाफीज यांचा दावा आहे की, या पेंडेंटवर कुराणाच्या आयत-उल-कुर्सी कोरलेली आहे. याला धार्मिक महत्त्व आहे. तिने फॅशन म्हणून पेंडेंट मिरवल्यामुळं धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं त्यांचे म्हणणं आहे.

हाफिज यांनी पुढे म्हटलं आहे की, मुस्लिम समाजात कुराणमधील आयती अत्यंत पवित्र मानल्या जातात. धार्मिक श्रद्धेनुसार, अनेक लोक केवळ वजू करताना, म्हणजेच प्रार्थना करताना, कुराणमधील आयतींना स्पर्श करतात. धार्मिक श्रद्धेशी संबंधित असलेले हे लॉकेट सभ्यतेला न शोभणाऱ्या कपड्यांसोबत फॅशन म्हणून परिधान केले जात असल्याच्या वस्तुस्थितीवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. भोपाळच्या नवाबाचे चिन्ह परिधान करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही, परंतु पवित्र आयत असलेले लॉकेट अशा प्रकारे वापरणे अयोग्य आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

करिनाला कायदेशीर नोटिस पाठवत अब्बास हफीज यांनी तिने सोशल मीडियावर अपलोड केलेले सर्व फोटो डिलीट करण्याची मागणी केली आहे. पवित्र धार्मिक चिन्हांचा अशा प्रकारे वापर करू नये, असेही त्यांनी नमूद केले आहे.  या प्रकरणी करीना कपूर आणि रिया कपूर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, अब्बास हफीज यांचे वकील मोहम्मद जफर यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि याच आधारावर मागणीची नोटीस जारी करण्यात आली आहे. वकिलांनी इशारा दिला की, जर फोटो हटवले नाहीत आणि सार्वजनिकरित्या  माफी मागितली नाही, तर पोलीस किंवा सक्षम न्यायालयामार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल.

करिनाने दिवाळीच्या निमित्ताने गळ्यात 30 कॅरेटचा पाचू (emerald) असलेले एक ऐतिहासिक पेंडंट घातले होते. या पेंडंटवर इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानली जाणारी 'आयत-अल-कुर्सी' कोरलेली आहे.  हे पेंडंट सुमारे 200 ते 400 वर्षे जुने असून ते भोपाळच्या पूर्वीच्या राजघराण्यातील बेगमांच्या (शाहजहाँ बेगम आणि सुल्तान जहाँ बेगम) ऐतिहासिक संग्रहातील आहे. सैफ अली खान यांच्या आजी साजिदा सुल्तान या भोपाळच्या शेवटच्या नवाबाच्या कन्या होत्या. त्यामुळे हा दागिना वारसाहक्काने पतौडी कुटुंबाकडे आला असून करिनाने तो दिवाळीच्या कार्यक्रमात परिधान केला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES