SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बाबाच्या कुशीतून टकमक पाहणारी सरायाह, सिद्धार्थ-कियाराच्या लेकीची पहिली झलक, व्हिडिओ व्हायरल

Sidharth-Kiara Daughter Face Reveal: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लेकीचा अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 18, 2026, 12:58 IST | Updated: Nov 18, 2026, 13:07 IST
Image Credit: Sidharth-Kiara Daughter Face Reveal
Join

बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. याआधी जुलै 2025मध्ये त्यांना मुलगी झाली होती. आत्तापर्यंत या जोडप्याने त्यांच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. मात्र पॅपाराझीने सिद्धार्थ-कियाराच्या लेकीची पहिली झलक टिपली आहे. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

खरं तर, सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या लेकीसोबत जयपूर विमानतळावर दिसले. व्हिडिओमध्ये हे जोडपे आपल्या मुलीला उचलून घेतलेले दिसत आहे. सरैयाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, तिची एक छोटीशी झलक नक्कीच दिसते. व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी त्यावर चर्चा सुरू केली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये, या जोडप्याने सोशल मीडियावर कियारा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची घोषणा केली होती. एक गोड पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले होते, "पुन्हा एकदा, आम्हाला आयुष्यातील सर्वात मोठी भेट मिळाली आहे. आमची हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेलं आहे." मात्र, कियाराच्या प्रसूतीच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चाहते सध्या या आनंदाच्या बातमीने खूप उत्सुक आहेत.

 

 

कियारा अडवाणीने नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या नवव्या सीझनमध्ये मातृत्वाबद्दल मनमोकळेपणाने खुलासा केला आहे. तिने स्पष्ट केले की, घरातील जबाबदाऱ्या आणि प्रोफेशनल कमिटमेंट्स यांच्यात संतुलन साधणे सोपे नाही. सतत अपराधीपणाची भावना मनात न बाळगता या दोन्ही गोष्टी कशा सांभाळाव्यात, असा प्रश्न अनेकदा पडतो, असं तिने म्हटलं आहे. कियाराने कबूल केले की, आई झाल्यानंतर 'मॉम गिल्ट' म्हणजेच आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ न शकण्याची भावना कायम राहते.

सिद्धार्थ आणि कियाराच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ मल्होत्रा ​​शेवटचा 'द व्वान' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरासरी प्रतिसाद मिळाला होता. कियाराचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'टॉक्सिक' देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. सध्या, त्या दोघांपैकी कोणाच्याही नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. सिद्धार्थ 'रेस 4' मध्ये दिसणार असल्याच्या बातम्या असल्या तरी, याला दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, कियारा 'कमल और मीना' या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES