हॉलिवूडमधील एक नामवंत अभिनेता सध्या त्याच्या काही व्हायरल फोटोंमुळे ट्रोल होतोय. खरं तर त्याचे हे फोटो हवाई बेटांवरील सुट्टींदरम्यानचे आहेत. मात्र त्यावरुन त्याला ट्रोल करण्याचं कारण ठरत आहे त्याच्यापेक्षा वयाने छोटी असलेली त्याची गर्लफ्रेंड! विशेष म्हणजे ती या व्हायरल झालेल्या सगळ्याच फोटोंमध्ये दिसतेय असंही नाहीये तरी तिच्यावरुन हा अभिनेता का ट्रोल होतोय ते पाहूयात...
कोण आहे हा अभिनेता?
ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, लिओनार्डो डिकॅप्रिओ! सामन्य भारतीय आजही त्याला 'टायटॅनिक'वाला हिरो म्हणून ओळखतात तोच हा लिओनार्डो डिकॅप्रिओ! 51 वर्षीय लिओनार्डो डिकॅप्रिओचा पॅसिफिक समुद्र किनाऱ्यावरील शर्टलेस फोटो शुक्रवारपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्याने काळ्या-पांढऱ्या रंगाचा बरमुडा परिधान केला आहे. या व्हायरल फोटोंपैकी काही फोटोंमध्ये लिओनार्डो डिकॅप्रिओसोबत इटालियन मॉडेल असलेली त्याची गर्लफ्रेंड व्हिटोरिया सेरेटीही दिसत आहे. व्हिटोरिया सेरेटी ही केवळ 28 वर्षांची आहे. यावरुनच लिओनार्डो डिकॅप्रिओ ट्रोल होतोय.
अनेकदा ट्रोल झालाय
खरं तर लिओनार्डो डिकॅप्रिओ हा यापूर्वीही डेटिंगवरुन ट्रोल झाला आहे. तो अनेकदा त्याच्यापेक्षा लहान वयाच्या मुलींनाच डेट करतो अशी टीका सातत्याने त्याच्यावर होताना दिसते. त्याच्या यापूर्वीच्या अनेक गर्लफ्रेंड या 25 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या होत्या. त्याची सध्याची गर्लफ्रेंडही त्याच्यापेक्षा 23 वर्षांची लहान आहे. सध्याचे लिओनार्डो डिकॅप्रिओचे वयस्कर वाटत असल्याचे फोटो पाहून लोकांनी या वयाच्या फरकावरुनच त्याला टार्गेट केलं आहे.
Leonardo DiCaprio, 51, and his girlfriend Vittoria Ceretti, 28, were spotted enjoying a romantic beach stroll in Hawaii. The Oscar-winning actor went shirtless, showing off his relaxed beach physique, as the couple soaked up the sun ahead of his longtime friend Tobey Maguire’s ex-wife Jennifer Meyer’s wedding.
— HouseOfVanity (@HouseOfVanity88) October 13, 2026
का केलं जातंय ट्रोल?
समुद्रकिनाऱ्यावरील लिओनार्डो डिकॅप्रिओ फोटोंवर त्याला ट्रोल करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत. एकाने "मला तर ही गोष्ट खटकते की, तो स्वतःच्या शरीराची अजिबात काळजी घेताना दिसत नाही पण त्याला डेट करायला मात्र सुपर मॉडेल असलेल्या स्त्रिया हव्या असतात," असं म्हटलं आहे. यावरुन दुसऱ्याने खोचकपणे लिओनार्डो डिकॅप्रिओकडे भरपूर पैसा असल्याचं अधोरेखित करताना उपरोधिकपणे,"अरे तो करोडपती आहे हे तुला माहिती नाहीये का?" असा सवाल केला आहे.

आतापर्यंत झाल्यात 10 गर्लफ्रेंड
सेरेटीला डेट करण्यापूर्वी लिओनार्डो डिकॅप्रिओने प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल जिझेल बुंडशेनला 2000 ते 2005 दरम्यान डेट केलं. या दोघांचं डेटिंग सुरु झालं तेव्हा जिझेल अवघ्या 20 वर्षांची होती. त्यानंतर लिओनार्डोने इस्रायली मॉडेल बार रफाएलीला डेट करण्यास सुरुवात केली. त्यांचं नातं सहा वर्ष टिकलं अन् 2011 मध्ये त्याचं ब्रेकअप झालं. पुढे 'गॉसिप गर्ल' फेम प्रसिद्ध अभिनेत्री ब्लेक लाइव्हली आणि लिओनार्डो 2011 मध्ये काही महिन्यांसाठी रिलेशनशिपमध्ये होते. 2012 मध्ये 'व्हिक्टोरियाज सिक्रेट'ची मॉडेल एरिन हीथरटन आणि लिओनार्डो हे जवळपास 10 महिने एकमेकांना डेट करत होते. जर्मन मॉडेल टोनी गार्न आणि लिओनार्डो हे पुढे सव्वा वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.
शेवटच्या पाच गर्लफ्रेंड कोण?
'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड'ची मॉडेल आणि अभिनेत्री केली रोहरबॅकसोबत लिओनार्डो 2015 मध्ये रिलेशनशिपमध्ये होता. डॅनिश मॉडेल निना अगदाल आणि लिओनार्डो यांनी साधारण दीडे ते दोन वर्ष एकमेकांना डेट केले. 2017 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कॅमिला मोरोनसोबत लिओनार्डो जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. 2022 मध्ये कॅमिलाच्या 25 व्या वाढदिवसानंतर काही दिवसांतच दोघांचं ब्रेकअप झालं. कॅमिला मोरोनसोबतच्या ब्रेकअपनंतर लिओनार्डोचे नाव जगप्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदीदसोबत जोडले गेले. 2023 च्या सुमारास भारतीय वंशाची ब्रिटिश मॉडेल नीलम गिल आणि लिओनार्डो एकत्र दिसल्याने ते एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. 2023 पासून लिओनार्डो व्हिटोरिया सेरेटीला डेट करतोय. ही त्याच्या आयुष्यातील 11 वी जोडीदार असल्याचं सांगितलं जातं. लिओनार्डो डिकॅप्रिओ आता त्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आल्याचं दिसतंय.