SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तनुश्री प्रकरणाला अवाजवी महत्त्व...', नाना पाटेकर यांचे मित्र महेश मांजरेकरांनी केले धक्कादायक विधान!

नाना पाटेकर यांचे जवळेच मित्र आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मोठे वक्तव्य केले आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 13, 2026, 08:34 PM IST | Updated: Nov 13, 2026, 08:47 PM IST
Join

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुबांना त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. गोवा येथील त्यांच्या राहत्या घरी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या निधनाने त्यांचे जवळचे मित्रपरिवार अनेकदा त्यांची आठवणी काढत असतात. नाना पाटेकर यांचे जवळेच मित्र आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मोठे वक्तव्य केले आहे. मुलाखतीमध्ये महेश यांना सर्वात मोठी खंत ही आहे की, नाना पाटेकर यांचे निधन झाले तेव्हा ते लंडनमध्ये होते. आता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ताच्या यांच्या वादावर देखील मांजरेकरांनी वक्तव्य केले आहे.

नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने नानांचे निधन झाले. न्यूज18 मराठीशी बोलताना मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी नानांसोबतच्या आपल्या अनेक वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, त्यांचे नाते खूप खास होते आणि प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धतही वेगळी होती. मैत्री व्यक्त करण्यासाठी ते शिवीगाळसुद्धा करायचे. महेश म्हणाले की, जर नाना आज त्यांच्यासोबत असते, तर इतक्या अचानक निघून गेल्याबद्दल त्यांनी त्यांना चांगलेच खडसावले असते.

हे ही वाचा

पत्नीसोबत गोविंदाचा वाद सुरु असताना कोमल राणीने अभिनेत्यासोबत शेअर केले रोमँटिक फोटो!

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादावर देखील महेश मांजरेकर यांनी विधान केले आहे. संभाषणादरम्यान, महेशने नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील जुन्या वादावरही भाष्य केले. 2018 मध्ये, या प्रकरणामुळे भारतात #MeToo चळवळीला सुरुवात झाली होती. तनुश्रीने आरोप केला होता की, 2008 च्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी तिला नृत्याच्या स्टेप्स शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन केले होते. नानांनी हे आरोप फेटाळून लावले होते. महेश मांजरेकर यांनी या प्रकरणात नानांचा बचाव करत म्हटले की, या घटनेला अवाजवी महत्त्व देण्यात आले आहे असे त्यांना वाटते.

महेश मांजरेकरांनी स्पष्ट केले की, चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असलेले अनेक लोक त्यांच्या ओळखीचे होते आणि त्यांनी त्यांना सांगितले होते की असे काहीही घडले नव्हते. नाना पाटेकर यांचे निधन झाल्यानंतर तनुश्री दत्ताने सोशल मिडियावर अनेक धक्कादायक आणि वादग्रस्त विधाने केली होती, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत पाहायला मिळाली होता. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES