SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पूर्णपणे बदललं प्रसिद्ध आयर्न मॅनचं पात्र, Marvel ने दिलं नवीन नाव, दिसणार हे बदल

Iron Man Replacement : मार्व्हलने त्यांचा अपकमिंग चित्रपट 'हल्क वॉर' मध्ये टोनी स्टार्कची नवीन ओळखीचा खुलासा केला असून आता हल्क वॉर या चित्रपटात आयर्नमॅन एका नव्या रूपात दिसून येणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 20, 2026, 11:42 IST | Updated: Nov 20, 2026, 12:08 IST
Image Credit: पूर्णपणे बदललं प्रसिद्ध आयर्न मॅनचं पात्र, Marvel ने दिलं नवीन नाव, दिसणार हे बदल
Join

 Iron Man Replacement : मार्वल स्टूडियोजकडून बनवण्यात आलेल्या 'आयर्न मॅन' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतात याचा प्रेक्षकवर्ग मोठा असून वर्ष  2013 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या आयर्न मॅन 3 नंतर हे पात्र दुसऱ्या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसून आलं. या दरम्यान मार्व्हलने त्यांचा अपकमिंग चित्रपट 'हल्क वॉर' मध्ये टोनी स्टार्कची नवीन ओळखीचा खुलासा केला आहे.

'आयरन मॅन' च्या नावात झाला बदल :

हल्क वॉर या चित्रपटात, सहसा आर्मर परिधान करणाऱ्या अव्हेंजरला आता 'आता 'द आयर्न थिंग' (The Iron Thing) नावाच्या एका जीवात रूपांतरित करण्यात आलं आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, हे पात्र 'इन्फरनल हल्क'च्या विस्तारत असलेल्या सैन्याचा एक भाग आहे.

'आयरन मॅन' मध्ये झाले बदल :

हे रूपांतर आयर्न मॅनच्या सुप्रसिद्ध लाल सोनेरी चिलखतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीवर अवलंबून राहण्याऐवजी, स्टार्क आता एका अवाढव्य आणि विचित्र आकाराच्या प्राण्यामध्ये रूपांतरित झाला आहे. ज्यामध्ये त्याच्या पारंपरिक तांत्रिक फायद्यांची जागा आता केवळ अफाट शारीरिक शक्तीने घेतली आहे.

हेही वाचा : समंथाच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल; कुटुंबासोबत साजरा केला खास क्षण

चेहऱ्यावर असणार मास्क :

मीडिया रिपोर्ट्सनुसार एक युद्ध हरल्यावर स्टार्कमध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत. नव्या रूपात त्याचं शरीर खूप विशाल असून त्याने साधारणपणे राखाडी रंगाचा मास्क घालता आहे. त्याखाली त्याचा खरा चेहरा लपून राहतो. 'द आयरन थिंग' हा अनेक अव्हेंजर्समध्ये सामील होतो. ज्याची ओळख 'इनफर्नल हल्क' द्वारे विद्रूप केली गेली आहे. 'हल्क वॉर' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2027 रोजी रिलीज होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES