'मी कार्यक्रम विनामूल्य करेन' दलेर मेहंदी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मिका सिंग संतापला! म्हणाला 'मंत्री सुबोध उनियाल यांनी...'
मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचा वाद चर्चेत आहे, गायकावर मंत्र्यांनी गंभीर आरोप केले आहेत. आता दलेर मेहंदी यांचा भाऊ मिका सिंगने सोशल मिडियावर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
पंजाबी गायक आणि मिका सिंग यांचा भाऊ दलेर मेहंदी यांचे नाव मागील दोन दिवसांपासून चर्चेत पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा भाऊ प्रसिद्ध गायक मिका सिंग याने त्याच्या भावाच्या समर्थनात आता उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांना काही प्रश्न केले आहेत नक्की झाले काय यासंदर्भात संपूर्ण प्रकरण सविस्तर वाचा.
मिका सिंगने त्याच्या सोशल मिडियावर उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांच्याशी झालेल्या वादानंतर भाजपचे राज्य सह-माध्यम प्रभारी विनय गोयल यांच्या वक्तव्याला एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. भाजपचे राज्य सह-माध्यम प्रभारी विनय गोयल यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून मिकाची ही प्रतिक्रिया आली आहे. एका पत्रकार परिषदेत सह-माध्यम प्रभारी विनय गोयल यांनी सांगितले की, ते दलेर मेहंदीचे चाहते आहेत . मात्र, नवरात्रीदरम्यान माता कुंजपुरीला समर्पित धार्मिक कार्यक्रमात घडलेल्या दृश्यांमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. जर दलेर मेहंदीची प्रकृती ठीक नव्हती, तर आयोजकांना आधीच कळवायला हवे होते. माता कुंजपुरीच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.
हे ही वाचा
फायरिंगनंतर टायगर श्रॉफने पहिल्यांदाच दाखवल्या आपल्या जखमा, VIDEO शेअर करून ट्रोलर्सची बोलती केली बंद
विनय गोयल म्हणाले की, दलेर मेहंदीने माफी मागावी. आपला भाऊ मिका सिंगबद्दल ते म्हणाले की, केवळ शब्दांनी काहीही होणार नाही. जर त्याला आपल्या भावाबद्दल आदर असेल, तर त्याने त्याऐवजी उत्तराखंडमध्ये येऊन विनामूल्य कार्यक्रम सादर करावा. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मिका सिंग म्हणाला की, मला चालेल मी उत्तराखंड येथे येईल आणि तुमच्यासाठी विनामुल्य मोफत कार्यक्रम सादर करेन पण त्याआधी कृपया तुमच्या मंत्र्यांना दलेर मेहंदी यांची माफी मागायला सांगा अशी मागणी मिका सिंगने सोशल मिडियावर केली आहे.
पुढे मिका सिंग म्हणाला की, दलेर पाजींनी दीड तास कार्यक्रम सादर केला आणि अनेक लोक त्यांच्यासोबत नाचत होते. असे असतानाही त्यांच्यावर दारुच्या नशेमध्ये असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत, पुढे गायक म्हणाला की, सर मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवतो आणि त्याठिकाणी काय घडले आहे ते तुम्ही स्वत: पाहू शकता, जर तुम्ही व्हिडिओमध्ये तुमचे मंत्री दारु पिऊन असतील तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल का? असा सवाल उपस्थित केला आहे. नियम आणि जबाबदारी सर्वांसाठी समान नसावी का?"