• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /फायरिंगनंतर टायगर श्रॉफने पहिल्यांदाच दाखवल्या आपल्या जखमा, VIDEO शेअर करून ट्रोलर्सची बोलती केली बंद

फायरिंगनंतर टायगर श्रॉफने पहिल्यांदाच दाखवल्या आपल्या जखमा, VIDEO शेअर करून ट्रोलर्सची बोलती केली बंद

अभिनेता टायगर श्रॉफवर फायरिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जखमी हाताचा व्हिडीओ दाखवला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 22, 2026, 06:02 PM IST|Updated: Oct 22, 2026, 06:14 PM IST
joinshare
फायरिंगनंतर टायगर श्रॉफने पहिल्यांदाच दाखवल्या आपल्या जखमा, VIDEO शेअर करून ट्रोलर्सची बोलती केली बंद
Image Credit: tiger shroff injured hands

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रविवारी 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या थरारक हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर अगदी जवळून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात राऊंड फायरिंग केली होती. या हल्ल्यामध्ये टायगर श्रॉफचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. तर एक चाहत्याही गंभीर जखमी झाला आहे. पण या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला आहे. पण या गोळीबारानंतर पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, टायगर श्रॉफ जखमी झालेला नाही. पण नंतर टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात त्याच्या हाताला आणि छातीवर पट्टी दिसत होती. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला होता की, टायगर श्रॉफला नेमकं काय झालं आहे.

त्यानंतर माहिती समोर आली की, हल्ल्याच्या वेळी टायगर श्रॉफवर गोळीबारानंतर गन पावडरमुळे भाजलं आहे. तसंच कारच्या खिडकीच्या काचेचे तुकड्यामुळे टायगर श्रॉफच्या हाताला जखम्या झाल्या आहेत. टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावरील यूजर्स उलट सुलट चर्चा करत आहेत. अशात फायरिंगनंतर पाच दिवसांनंतर टायगर श्रॉफच्या हातावरील जखमा दाखवल्या आहेत. टायगर श्रॉफच्या टीमने सोशल मीडियावर अभिनेत्याच्या जखमी हाताचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Team Tiger Shroff (@teamtigershroff)

 टायगर श्रॉफच्या टीमने इन्स्टाग्रामवर अभिनेत्याच्या जखमी हाताचा व्हिडीओ शेअर करून ट्रोलर्सला गप्प केलं आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या हातावर लहान, ठिपक्यांसारख्या खुणा आणि लालसरपणा दिसत आहे. त्यासोबत हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलंय की, "देव दयाळू आहे."

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Entertainment News
Trending News