• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /नानांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची शेवटची संधी... 'हा' ठरणार अखेरचा चित्रपट; रिलीज डेटही जाहीर; पहिली झलक पाहिली का?

नानांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची शेवटची संधी... 'हा' ठरणार अखेरचा चित्रपट; रिलीज डेटही जाहीर; पहिली झलक पाहिली का?

नाना पाटेकरांचं 8 ऑक्टोबर रोजी गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नाना पाटेकरांच्या निधानंतरही त्यांनी भूमिका साकारलेले काही चित्रपट आता मरणोत्तर प्रदर्शित होणार आहेत. नानांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्याची ही संधी कधी मिळणार जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 09, 2026, 01:44 PM IST|Updated: Oct 09, 2026, 02:19 PM IST
joinshare
नानांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची शेवटची संधी... 'हा' ठरणार अखेरचा चित्रपट; रिलीज डेटही जाहीर; पहिली झलक पाहिली का?
Image Credit: नानांनी यामध्ये साकारलीय स्पेशल भूमिका

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाना यांच्या अकाली मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून गोव्यात वास्तव्यास असतानाच नानांवर काळाने घाला घातला. नाना हे वयाच्या 75 व्या वर्षीही मनोरंजनसृष्टीत सक्रीय होते. नानांच्या मृत्यूनंतर त्यांचे काही चित्रपटांचे प्रदर्शन आता मरणोत्तर होईल. यापैकी काही चित्रपट या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. नानांचे कोणते चित्रपट त्यांच्या मरणानंतर प्रदर्शित होणार आहेत आणि त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता ठरु शकतो जाणून घेऊयात...

ईठा

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ईठाचित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक नाटक आहे. श्रद्धा कपूरने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धाबरोबरच रणदीप हुड्डा, अनंत जोशी यांच्यासह नाना पाटेकरही दिसणार आहेत. हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

शक्ती शालिनी (Shakti Shalini)

मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील शक्ती शालिनी हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. अनीत पड्डा, विशाल जेठवा, विनीत कुमार सिंह यांच्यासोबत नाना पाटेकर यांनी या चित्रपटामध्ये मांत्रिक बाबाची भूमिका केली आहे. या चित्रपटाची शूटिंग मे 2026 मध्ये पूर्ण झाली होती. सुरुवातीला 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता.  मात्र आता तो जानेवारी 2027 किंवा त्याही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. दिग्दर्शकाने हा नानांचा शेवटचा चित्रपट ठरु शकतो, असे म्हटले आहे.

द कन्फेशन ऑफ मेरी

अनंत महादेवन दिग्दर्शित गुन्हेगारी कथानकावर आधारित या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी फादर बेनेडिक्टची भूमिका केली आहे. या चित्रपटामधील काही संवाद बदल बाकी असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची डिसेंबरमधील तारीख अजून निश्चित झालेली नाही. 

 

हयात असताना प्रदर्शित झालेला चित्रपट कोणता?

नाना पाटेकर यांनी 1978 ते 2026 दरम्यान सुमारे 70 हून अधिक चित्रपटांत काम केले. मरणोत्तर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा विचार केल्यास ही संख्या वाढू शकते. नानांची कारकीर्द मुख्यतः हिंदी आणि मराठी चित्रपटांत होती तरी त्यांनी काही तमिळ, कन्नड आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं. नानांचा पहिला चित्रपट गमन (1978) होता. परिंदा (1989), प्रहार (1991), क्रांतिवीर (1994), नटसम्राट (2016) हे प्रमुख नानांच्या कारकि‍र्दीमधील प्रमुख चित्रपट आहेत. ते हयात असताना प्रदर्शित झालेल्या शेवटच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर ओ रोमियो आणि सुबेदार या चित्रपटांची नावं घेता येतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News