• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'माधुरीला अमेरिकेत कोणीही ओळखत नव्हतं, तेव्हा मी...'; 'पत्नीच्या प्रसिद्धीवर जगताय' टोमण्यावर डॉ. श्रीराम नेने स्पष्टच बोलले

'माधुरीला अमेरिकेत कोणीही ओळखत नव्हतं, तेव्हा मी...'; 'पत्नीच्या प्रसिद्धीवर जगताय' टोमण्यावर डॉ. श्रीराम नेने स्पष्टच बोलले

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी एका मुलाखतीत काही प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्यांनी माधुरीच्या प्रसिद्धीबाबतही स्पष्ट केलं आहे,

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 27, 2026, 09:51 AM IST|Updated: Oct 27, 2026, 09:53 AM IST
joinshare
'माधुरीला अमेरिकेत कोणीही ओळखत नव्हतं, तेव्हा मी...'; 'पत्नीच्या प्रसिद्धीवर जगताय' टोमण्यावर डॉ. श्रीराम नेने स्पष्टच बोलले
Image Credit: Madhuri Dixit and dr shriram nene (Photo: social Media)

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे स्टारडम आजही तसूभरही कमी झाले नाहीये. लग्नानंतर माधुरी दीक्षित अमेरिकेत स्थायिक झाली. मात्र काही काळाने ती पुन्हा एकदा भारतात परतली. माधुरी दीक्षित पुन्हा सिनेमांमध्ये सक्रीय झाली. पण त्याचबरोबर तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे देखील लाइमलाइटमध्ये आले. अलीकडेच डॉ. नेने यांनी मुलाखतीत माधुरीच्या स्टारडमचा कधी त्रास झाला का? असा सवाल करण्यात आला त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या जोडीचेही अनेक चाहते आहेत. जेव्हा माधुरी आणि डॉ. नेने पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांना माधुरी अभिनेत्री आहे हेच ठावूक नव्हतं. त्यामुळं दोघांनीही त्यांच्या नात्याला वेळ देऊन, समजून घेऊन लग्न केले. आज त्यांच्या संसाराला 27 वर्ष झाले. या दरम्यान, डॉ. नेने यांना बॉलिवूड स्टारचे पती म्हणून ओळखले जाते, याबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.

डॉ. श्रीराम नेने यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की,  पत्नीच्या प्रसिद्धीवर जगतोय, अशा टोमण्यांना काय उत्तर देणार, तेव्हा ते म्हणाले की, मी तिच्या प्रसिद्धीवर जगतोय. कारण अमेरिकेत तिला कोणीही ओळखत नव्हतं. मी तिथ हार्ट सर्जन होतो. त्यामुळं मला माहिती आहे की, तिचं भारतातील स्थान एका वेगळ्या पातळीवर आहे आणि मला तिचा अभिमान आहे. कारण तिच्यासारखे लोक या जगात कमी आहेत, असं नेने यांनी म्हटलं आहे.

नेने यांनी पुढे म्हटलं की, माधुरीसारख्या बड्या कलाकारासोबत लग्न केल्यानंतरही मला कधी असुरक्षित वाटले नाही. मला तिच्यावर गर्व आहे. आम्ही दोघांनीही आमच्या मेहनतीवर ओळख बनवली आहे. आमच्या लग्नाचे बंधन हे स्टारडमवर नाही तर एकमेकांवर असलेला विश्वास यावर टिकून आहे.

डॉ. नेने यांनी स्पष्ट केले आहे की, इतक्या लोकप्रिय व्यक्तीसोबत आयुष्य व्यतित करणे कधीकधी आव्हानात्मक असते. पण कधी कधी परिस्थितीनुसार स्वतःला घडवावे लागते. यूसीएलएमध्ये मेडिकल ट्रेनिंगदरम्यान हॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध लोकांवर उपचार केले आहेत. त्यामुळं त्या कलाकारांसाठी प्रायव्हसी जपणे काय असते हे माहिती आहे. त्यामुळं या अनुभवाने मला प्रसिद्धीची ओळख नव्याने पटली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Madhuri Dixit
Entertainment News
Mumbai News