• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /4 दिवसात 33 चित्रपट पाहा फक्त 100 रुपयांमध्ये; ऑस्करला गेलेला गोंधळ आणि अद्याप प्रदर्शित न झालेला ‘बंधू’ सिनेमा पाहण्याची संधी

4 दिवसात 33 चित्रपट पाहा फक्त 100 रुपयांमध्ये; ऑस्करला गेलेला गोंधळ आणि अद्याप प्रदर्शित न झालेला ‘बंधू’ सिनेमा पाहण्याची संधी

4 दिवसात 33 चित्रपट फक्त 100 रुपयांमध्ये पाहण्याची संधी आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने चित्रपताका 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. येथे दर्जेदार मराठी तित्रपट पहायला मिळणार आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 14, 2026, 08:56 PM IST|Updated: Nov 14, 2026, 09:04 PM IST
joinshare
4 दिवसात 33 चित्रपट पाहा फक्त 100 रुपयांमध्ये; ऑस्करला गेलेला गोंधळ आणि अद्याप प्रदर्शित न झालेला ‘बंधू’ सिनेमा पाहण्याची संधी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चित्रपताका  2026 :  सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या ‘चित्रपताका’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन रविवारी 15 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून या चार दिवसीय महोत्सवाची सुरुवात ‘बंधू’ या अद्याप अप्रदर्शित असलेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाने होणार आहे. 

‘चित्रपताका 2026’ यंदा दुसरे पर्व असून प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या महोत्सवात मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याबरोबरच चित्रपटविषयक विविध पैलूंवर संवाद, चर्चा आणि विचारमंथन करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता रवींद्र नाट्यमंदिराच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला असून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता नितीन सुपेकर दिग्दर्शित ‘बंधू’ हा उद्घाटकीय चित्रपट प्रदर्शित होईल. 

उपेंद्र लिमये व जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन भावांमधील नातेसंबंध, प्रेम, संघर्ष, जिव्हाळा आणि त्याग यांची भावस्पर्शी कथा मांडतो. अद्याप अप्रदर्शित असलेला हा सिनेमा पाहण्याची संधी या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिकांना मिळणार असून महोत्सवाच्या चार दिवसांत असे 33 आशयघन सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. 

चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हा महोत्सव एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, आशय-विषयांची विविधता, चित्रपट निर्मितीतील नवे तंत्रज्ञान, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, जाहिरात आणि वितरण अशा विविध विषयांचा वेध संवादसत्रांमधून घेतला जाणार आहे.

7 परिसंवाद, 4 विशेष मुलाखती आणि कार्यशाळांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्वे आणि नव्या पिढीतील चित्रपटकर्मी यांच्यात संवादाचा पूल उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखती हे या महोत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चित्रपट अभ्यासक सहभागी होणार आहेत.
 

महोत्सवपूर्ण नोंदणीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी सिनेमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे. विविध विषय, वेगवेगळ्या शैली, नव्या दिग्दर्शकांचे प्रयोग आणि प्रस्थापित चित्रपटकर्मींच्या कलाकृती अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर मराठी चित्रपटांच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक आशयाचेही दर्शन घडणार आहे. 

महोत्सवासाठी प्रेक्षकांकडून आकारण्यात येणारे चार दिवसांचे 100 रुपये नोंदणी शुल्क संपूर्णपणे दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांचा आनंद घेतानाच दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे, असे सांगत मराठी चित्रपटसृष्टीच्या कलात्मक वाटचालीचा उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवात चित्रपटप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे. महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रक, चित्रपट प्रदर्शनाच्या वेळा आणि नोंदणीची माहिती www.chitrapataka.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News