SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'लग्न म्हणजे हनिमूनचा...' 51 व्या वर्षी अभिनेत्रीने मक्का येथे केले तिसरे लग्न! फोटो व्हायरल

सिनेमासृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. एका शोमध्ये अभिनेत्रीने यासंदर्भात उघडपणे सांगितले आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 11, 2026, 15:20 IST | Updated: Nov 11, 2026, 15:48 IST
Join

बॅालिवूडचा अभिनेता आमिर खानने तिसरे लग्न केल्यानंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीका करण्यात आली होती. आता एका अभिनेत्रीने तिसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सिनेमासृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खान यांनी तिसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले असून अनेक मॉर्निंग शोचे सूत्रसंचालनही केले आहे. मात्र, तिच्या व्यावसायिक जीवनासोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत असते. अभिनेत्रीने एका शोमध्ये यासंदर्भात भाष्य केले आहे, नक्की काय म्हणाली अभिनेत्री यासंदर्भात सविस्तर वाचा.

अभिनेत्री किरण खान हिने आता तिसरे लग्न हे वयाच्या 51 व्या वर्षी केले आहे, मागील काही दिवसांपासून तिच्या लग्नाची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी उद्योगपती मिर्झा इश्तियाक बेग यांच्याशी विवाह करून नवीन आयुष्याला सुरुवात केली. या जोडप्याने मक्का येथे साध्या पद्धतीने लग्न केले आणि त्यानंतर एकत्र उमराह केली. अभिनेत्री किरण खान हिने सूत्रसंचालिका निदा यासिरच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती यामध्ये तिने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. या शोमध्ये अभिनेत्रीने लग्नाला गरजेपेक्षा जास्तच रोमँटिक बनवणाऱ्या महिलांच्या मानसिकतेवर चर्चा केली. 

हे ही वाचा

अभिनेत्रीच्या इमारतीला भीषण आग; जुळ्या मुलांसह जीव वाचला, पण जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने अश्रू अनावर

तिच्या तिसऱ्या लग्नानंतर, किरण खान पाकिस्तानी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका निदा यासिरच्या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. त्या शोमध्ये तिने, लग्नाला गरजेपेक्षा जास्तच रोमँटिक बनवणाऱ्या महिलांच्या मानसिकतेवर चर्चा केली.  किरण खान लग्नाबद्दल म्हणाल्या, "मला वाटतं, लग्नाबद्दल एक सामान्य गैरसमज असा आहे की तो फक्त एक मधुचंद्राचा काळ असतो, ज्यात सर्व काही चांगलं आणि प्रेमाने भरलेलं असतं. लहान वयात लग्न करताना माझ्या मनात हेच होतं." या विचारसरणीमुळे लोकांना अनेकदा असे वाटते की त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही. पण वास्तविक पाहता, लग्नानंतरचा मधुचंद्राचा काळ हा जुळवून घेण्याचा असतो, कारण वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन लोक एकत्र राहू लागतात.

अभिनेत्रीने सोशल मिडियावर लग्न केल्यानंतर काही फोटो शेअर केले होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे त्यांचे तिसरे लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पतीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. त्यांच्या घटस्फोटानंतर, किरण खान यांनी 2013 मध्ये निवृत्त पाकिस्तानी मेजर नझीर अली यांच्याशी लग्न केले. मात्र, काही वर्षांनंतर हे लग्नही संपुष्टात आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES