संत प्रेमानंद महाराजांचा वृंदावन इथल्या श्रीहित राधा केली कुंज आश्रम सध्या वादात अडकले आहे. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न करणारी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे, प्रियांका पंडित. ही भोजपुरी अभिनेत्री असून हिने ग्लॅमरचं जग सोडलं आणि तिने स्वत:ला कृष्णाला समर्पित केलं आहे. तिने सोशल मीडियावर आपण प्रेग्नेंट असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.
एकेकाळी चित्रपटांमधील तिच्या बोल्ड अभिनयामुळे ती चर्चे होती. प्रियांका आता वृंदावनमध्ये भक्तीपूर्ण साधना करते. अभिनेत्री आई होणार आहे ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने एक फोटो शेअर केला असून त्यात बाळाचे मोजे, एक पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट किट दाखवली आहे. त्यात तिने लिहिलंय की, ती हे छोटेसे गुपित अनेक दिवसांपासून जपून ठेवत होती. आता, ती तिच्या आयुष्यातील हा नवीन आनंद जगासोबत शेअर करत आहे. हा केवळ एका नवीन अध्यायाची सुरुवात नाही, तर एका नवीन जगाची सुरुवात आहे. त्यांची छोटीशी जादू लवकरच येणार आहे आणि राधा राणी व ठाकूरजींच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. प्रियांकाच्या पोस्टनंतर चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
प्रियंका पंडित एकेकाळी भोजपुरी चित्रपटसृष्टीतीली एक मोठं नाव होतं. अभिनेत्रीचा जन्म जौनपूरमध्ये झाला असून तिने 50 हून अधिक भोजपुरी चित्रपटात काम केलं आहे. खेसारीलाल यादव, पवन सिंग आणि रितेश पांडे यांसारख्या प्रमुख भोजपुरी कलाकारांसोबतही प्रियंकाने काम केलं आहे.

एकेकाळी प्रियंकाचा तिच्या प्रियकरासोबतचा एक कथित एमएमएस व्हायरल झाल्यामुळे ती वादात अडकली होती. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. प्रियांकाने हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितलं होतं. या वादामुळे तिच्या वैयक्तिक नात्यावरही परिणाम झाला होता आणि तिचं बॉयफ्रेंडसोबत ब्रेक झालं होतं.