SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बॉयफ्रेंडसोबत नको ते व्हिडीओ, MMS प्रकरणानंतर मनोरंजन विश्व सोडलं; आता प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न करणारी अभिनेत्री प्रेग्नेंट

MMS प्रकरणानंतर मनोरंजन विश्व सोडल्यानंतर अभिनेत्रीने प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न केलं. आता या अभिनेत्रीने गूड न्यूज दिली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 05, 2026, 01:49 PM IST | Updated: Oct 05, 2026, 01:54 PM IST
Image Credit: प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न करणारी अभिनेत्री प्रेग्नेंट
Join

संत प्रेमानंद महाराजांचा वृंदावन इथल्या श्रीहित राधा केली कुंज आश्रम सध्या वादात अडकले आहे. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न करणारी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे, प्रियांका पंडित. ही भोजपुरी अभिनेत्री असून हिने ग्लॅमरचं जग सोडलं आणि तिने स्वत:ला कृष्णाला समर्पित केलं आहे. तिने सोशल मीडियावर आपण प्रेग्नेंट असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.

एकेकाळी चित्रपटांमधील तिच्या बोल्ड अभिनयामुळे ती चर्चे होती. प्रियांका आता वृंदावनमध्ये भक्तीपूर्ण साधना करते. अभिनेत्री आई होणार आहे ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने एक फोटो शेअर केला असून त्यात बाळाचे मोजे, एक पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट किट दाखवली आहे. त्यात तिने लिहिलंय की, ती हे छोटेसे गुपित अनेक दिवसांपासून जपून ठेवत होती. आता, ती तिच्या आयुष्यातील हा नवीन आनंद जगासोबत शेअर करत आहे. हा केवळ एका नवीन अध्यायाची सुरुवात नाही, तर एका नवीन जगाची सुरुवात आहे. त्यांची छोटीशी जादू लवकरच येणार आहे आणि राधा राणी व ठाकूरजींच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. प्रियांकाच्या पोस्टनंतर चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

हेसुद्धा वाचा  - संत प्रेमानंद महाराजांनी अखेर मौन सोडले! साधकाच्या मृत्यूनंतर 8 दिवसांनी एकाच शब्दात..., एकापाठोपाठ एक भक्त बेपत्ता?

प्रियंका पंडित एकेकाळी भोजपुरी चित्रपटसृष्टीतीली एक मोठं नाव होतं. अभिनेत्रीचा जन्म जौनपूरमध्ये झाला असून तिने 50 हून अधिक भोजपुरी चित्रपटात काम केलं आहे. खेसारीलाल यादव, पवन सिंग आणि रितेश पांडे यांसारख्या प्रमुख भोजपुरी कलाकारांसोबतही प्रियंकाने काम केलं आहे.

एकेकाळी प्रियंकाचा तिच्या प्रियकरासोबतचा एक कथित एमएमएस व्हायरल झाल्यामुळे ती वादात अडकली होती. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. प्रियांकाने हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितलं होतं. या वादामुळे तिच्या वैयक्तिक नात्यावरही परिणाम झाला होता आणि तिचं बॉयफ्रेंडसोबत ब्रेक झालं होतं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES