SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मागील जन्मात अशोक वंशाचा राजा, पत्नीची केलेली हत्या', संजय दत्तने सांगितली पुर्नजन्माची गोष्ट, म्हणाला, 'त्याचीच शिक्षा...'

संजय दत्त याने अलीकडेच केलेला दाव्यामुळं तो चर्चेत आला आहे. त्याने थेट पुर्नजन्माची कथा ऐकवल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 12:36 IST | Updated: Nov 13, 2026, 12:39 IST
Image Credit: priest told Sanjay Dutt that he was a king in the Ashoka dynasty past life
Join

बॉलिवूडचा मुन्ना भाई संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळं. अलीकडेच संजूबाबाने करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने पुर्नजन्माबाबत भाष्य केलं आहे. संजय दत्तने सांगितलेले किस्सा ऐकून करण जोहरही आश्चर्यचकित झाला आहे.

संजय दत्तने अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने दावा केला की, तो मागील जन्मी अशोक वंशाचा राजा होता. तेव्हा त्याला प्रेमात धोका मिळाला होता व नंतर मृत्यू आला होता. ही कथा एका चित्रपटाप्रमाणेच आहे.

करण जोहरसोबत बोलताना संजय दत्तने म्हटलं की, त्याला एका मित्राने अशा गावात जाण्याचा सल्ला दिला. जिथे अंगठ्याचा निशाण बघून ताडपत्र म्हणजेच पान शोधले जातं. या मान्यतेनुसार, या पानांवर माणसाच्या पुर्नजन्माबाबत गोष्टी लिहिलेल्या असतात. जेव्हा माझ्या नावाचे पान मिळाले तेव्हा त्यावर लिहिलं होतं की तो अशोक वंशाच्या राजा आहे.

संजय दत्तने पुढे म्हटलं की, ही घटना कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाप्रमाणेच आहे. मागील जन्मात माझ्या पत्नीचे माझ्याच दरबारातील मंत्र्यासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या राजाला रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी तिने त्याला युद्धावर जाण्यास प्रवृत्त केले. मात्र त्याचा उलट परिणाम झाला. राजाने युद्ध जिंकले अन् परत आला. तेव्हा त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत कळलं.

पुढे संजय दत्तने म्हटलं की, 'पत्नीने दिलेल्या धोका लक्षात आल्यानंतर त्याने मंत्री आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. त्यानंतर स्वतःला शिवभक्तीत मग्न करुन घेतलं आणि राजपाट सोडून जंगलात निघून गेला. त्यानंतर उपवास करुन प्राण गमावले.'

संजयच्या मते, त्याच्या मागील जन्माच्या कथेचा त्याच्या वर्तमान जीवनावरही प्रभाव पडला आहे. तो म्हणाला की, कदाचित मागील जन्मात केलेल्या चांगल्या कर्मांमुळेच त्याचा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला आणि त्याला चित्रपटसृष्टीत एवढी प्रसिद्धी आणि कारकीर्द मिळाली. पण त्याचा असाही विश्वास आहे की, मागील जन्मात केलेल्या कृत्याची किंमत त्याला या जन्मात चुकवावी लागत आहे. यामुळेच त्याला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, संजय दत्तने या गोष्टी त्याचा अनुभव आणि विश्वास म्हणून सांगितल्या. पूर्वजन्म किंवा ताडपत्रांवरील शिलालेखांना कोणतीही स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे, त्याने सांगितलेली ही कथा त्याचा वैयक्तिक विश्वास म्हणून पाहिली पाहिजे.

संजय दत्तच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, संजय दत्तने 1981 साली 'रॉकी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने 'खलनायक', 'वास्तव: द रिॲलिटी', 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस.' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES