'राईज अँड फॉल' शो मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, या शोमध्ये होणारे उलटफेर त्याचबरोबर शोमध्ये होणारी भांडणांची चर्चा पाहायला मिळते. शो सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या शोमध्ये हाणामारी झाली होती, आता शोमधील नाही तर शोमध्ये सहभागी झालेली स्पर्धक जेव्हा शोमधून बाहेर झाली त्यानंतर तिला आता सोशल मिडियावर जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत आहेत. पंजाबी अभिनेत्री आणि गायिका सारा गुरपाल 'राईज अँड फॉल' या रिॲलिटी शोमधून बाहेर पडली आहे, पण शोमधून बाहेर पडल्यानंतर सारा अडचणीत सापडली आहे. तिने सोशल मिडियावर या प्रकरणावर उघडपणे सांगितले आहे नक्की काय म्हणाली अभिनेत्री यासंदर्भात सविस्तर वाचा.
शोमध्ये सारा गुरपाल अनेक वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत पाहायला मिळाली, कधी गौतम गुलाटीशी वाद तर कधी प्रियंका चौधरीशी वाद पाहायला मिळाला. साराने शो सोडल्यापासून तिला सोशल मीडियावर तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. साराने आता तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून खुलासा केला आहे की, तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. तिने हेही उघड केले आहे की, द्वेष करणारे तिच्या कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. साराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले - 'राईज अँड फॉल 2' हा एक वेगळा अनुभव होता, पण शोमधून बाहेर आल्यापासून सोशल मीडियावर जे काही दिसत आहे ते खूप विचित्र आणि किळसवाणे आहे.
हे ही वाचा
साराने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही लिहीले आहे की, तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल किंवा नसाल, पण मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी देणे आणि माझ्या शरीरावर अश्लील टिप्पणी करणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, पण त्यामुळे तुम्हाला कोणालाही धमकावण्याचा किंवा शिवीगाळ करण्याचा हक्क मिळत नाही. धमक्या देणाऱ्या ट्रोलर्सवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही साराने दिला. अशा व्यक्तींना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले जाईल, असे तिने स्पष्टपणे सांगितले.
ट्रोलर्सच्या घृणास्पद वागणुकीवर संताप व्यक्त करत सारा म्हणाली – तुम्हाला लाज वाटायला हवी. सारा 'राईज अँड फॉल'मुळे चर्चेत आली. तिच्या एन्ट्रीनंतर तिने खुलासा केला की, अनेक क्रिकेटपटूंनीही तिला मेसेज केले होते. तिने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, शो नंतर ट्रोलर्सच्या कृतीमुळे सारा आता नाराज आहे.