'मला चिंता वाटते, विजय...', रश्मिका मंदाना ट्रोलर्सवर संतापली! दिले सडेतोड उत्तर
अभिनेत्रीने सांगितले की, विजय देवराकोंडाने होकार देण्यापूर्वी, ती त्याला जवळपास 100 वेळा विचारून वर्षभर लग्नासाठी मनवत होती. इंटरनेट वापरकर्त्यांनी ही गोष्ट लगेच उचलून धरली आणि त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली.
करण जोहरचा प्रसिद्ध शो कॅाफी विथ करणच्या मागील भागामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तिचा पती विजय देवराकोंडा हे दोघे पाहुणे म्हणून आले होते. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांच्या प्रेमाबद्दल मोठ्या चर्चा पाहायला मिळाल्या. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिचा पती विजय देवराकोंडा याला लग्नासाठी कसे तयार केले याबद्दल तिने सांगितले. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. अभिनेत्रीने सांगितले की, विजय देवराकोंडाने होकार देण्यापूर्वी, ती त्याला जवळपास 100 वेळा विचारून वर्षभर लग्नासाठी मनवत होती. इंटरनेट वापरकर्त्यांनी ही गोष्ट लगेच उचलून धरली आणि त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली.
सोशल मिडियावर मागील काही दिवसांपासून या प्रकरणावर अभिनेत्यावर आणि अभिनेत्रीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा या दोघांनीही सोशल मिडियावर स्पष्टीकरण दिले आहे. रश्मिका मंदानाने सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने लिहीले आहे की, "मी सहसा या गोष्टींना प्रतिसाद देत नाही, कारण प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. कधीकधी मला इतरांची मतं वाचायला मजाही येते. पण यावेळी, माझ्या मुलाखतीवरून झालेला गदारोळ हा मतांपेक्षा, आपला राग काढण्यासाठी कोणालातरी शोधणाऱ्या एका संतप्त जमावासारखा जास्त वाटतो."
हे ही वाचा
पंजाबी गायिकेला जीवे मारण्याच्या धमक्या, गायिकेने कठोर कायदेशीर कारवाईचा दिला इशारा!
पुढे तिने लिहीले आहे की, सर्वात आधी, मी लग्नासाठी किती वेळा विचारले आणि त्याला पटवायला एक वर्ष किती लागले, हा मुद्दा कधीच नव्हता. तिथेच तुमचा गोंधळ झाला. हो, आमच्यात असे संवाद झाले होते, पण आमच्यापैकी कोणीही मोठ्या प्रस्तावाची अपेक्षा करत नव्हते. तो संवाद फक्त एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ आणि अवकाश घेण्याबद्दल होता. आयुष्यातील सर्व चढ-उतार, आनंद आणि तणाव असूनही, आम्हाला खरोखर हेच हवे आहे का आणि हीच योग्य वेळ आहे का, याची आम्हाला खात्री करून घ्यायची होती. आणि मग आम्ही ते केले, आणि आम्ही एकमेकांना निवडले."
सोशल मिडियावर हे प्रकरण प्रचंड तापले होते त्यामुळे आता अभिनेत्री आणि अभिनेत्याला स्पष्टीकरण द्यावे लागले. जे लोक त्यांच्या नात्याकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहत होते, त्यांना रश्मिकानेही प्रत्युत्तर दिले. तिने लिहिले, "आम्ही दोघांनीही आमचे आयुष्य स्वतःच्या इच्छाशक्तीने आणि मेहनतीने घडवले आहे. आम्ही बुद्धिमान, सक्षम प्रौढ व्यक्ती आहोत, ज्यांना आपण कसे जगायचे आणि कोणासोबत राहायचे हे निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि आम्ही अमेरिकेला निवडले आहे. शेवटपर्यंत आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकांनाच निवडत राहू."