SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घटस्फोट, आता वर्षभरात प्रसिद्ध दिग्दर्शकाने गुपचूप उरकलं दुसरं लग्न

मराठी चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांनी दुसरं लग्न केलं आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 07:36 IST | Updated: Nov 13, 2026, 07:38 IST
Image Credit: Renowned Marathi director Avinash Arun gets married for the second time after divorce with kadambari kadam
Join

लोकप्रिय दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. 11 नोव्हेंबर रोजी त्यांनी गर्लफ्रेंड रितुजा जयंत हिच्याशी लग्न केले आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन त्यांनी लग्नाची गुड न्यूज दिली आहे. अविनाश अरुण यांनी मराठीत गाजलेला चित्रपट किल्ला याचे आणि पाताल लोक या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले  आहे.

अविनाश अरुण यांनी इन्स्टाग्रामवर रितुजासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी 11.11.26 आम्ही एक इच्छा मागितली आणि ती पूर्ण झाली. असं कॅप्शन दिलं आहे. तर, या पोस्टला जस्ट मॅरीड असा हॅशटॅगही दिला आहे. अविनाश यांच्या या पोस्टला अनेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अविनाश अरुण यांच्या पोस्टवर चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ललित प्रभाकर, शरद केळकर, अली फैजल, मोना सिंह यांनीही कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अविनाश यांचेही दुसरे लग्न असून याआधी त्याचे लग्न मराठी अभिनेत्री कादंबरी कदमसोबत झालं होतं. अविनाश आणि कादंबरी यांनी 10 नोव्हेंबर 2016रोजी लग्न केले होतं. त्यांना कार्तिक नावाचा एक मुलगा आहे. मात्र नऊ वर्षांच्या संसारानंतर 2025 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता अविनाश यांनी रितुजा जयंतशी लग्न करुन वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.

अविनाश अरुण यांनी किल्ला, थ्री ऑफ अस, गाजलेली सिरीज पाताल लोक, स्कुल ऑफ लाइज, प्रहारः द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम या कलाकृतीचं दिग्दर्शन केलं आहे. अविनाश अरुण हे सिनेमॅटोग्राफरदेखील आहेत. मसान, दृश्यम, मदारी व हिचकीचे सिनेमॅटोग्राफर होते.

त्यांच्या ‘किल्ला’ या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक मिळवलं होतं. या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिस्टल बेअर पुरस्कार मिळाला होता. तसंच 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मानही मिळाला होता.

अविनाश अरुण सध्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. राजकुमार राव या चित्रपटात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES