रितेश देशमुखची इंस्टाग्रामवर सूचक पोस्ट, पत्नी जिनिलियासोबतच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जिनिलिया हिच्या सोबत एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा फोटो पोस्ट करून रितेशला नेमकं काय म्हणायचं आहे याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh : काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्यावर आधारित बिलॉन्गइंग या आत्मचरित्र पुस्तकाचं प्रकाशन झालं. दिल्लीत झालेल्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी राहुल गांधी यांनी आपले आई वडील राजीव आणि सोनिया गांधी यांच्याविषयीची आठवण शेअर केली. यात त्यांनी म्हंटलं होतं की लहानपणी मी आमच्या घरी आईला प्रेमाने वडिलांच्या मांडीवर बसून जेवण करताना पाहिलं आहे, पण माझ्या मित्रांच्या घरी तसं कधीच दिसायचं नाही. मात्र राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या या आठवणीवर अनेकांनी टीका केली. सोशल मीडियावर सुद्धा त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं. मात्र आता अभिनेता रितेश देशमुख याने त्याची पत्नी जिनिलिया सोबत तसाच एक फोटो शेअर केला. ज्याची सध्या तुफान चर्चा होत आहे.
राहुल गांधींनी शेअर केलेली आठवण :
सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यातील प्रेमाविषयीचा किस्सा सांगितलेला. यात राहुल गांधी म्हणाले होते की, जेवणाच्या वेळी डायिंग टेबलवर माझी आई ही माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायची आणि ते दोघे एकत्र जेवण करायचे. हे दृश्य मी माझ्या घरी रोज बघायचो. मला असं वाटायचं की इतर घरांमध्ये सुद्धा असच होत असेल, पण मी जेव्हा माझ्या मित्रांच्या घरी जायचो तेव्हा मला तसं दृश्य दिसायचं नाही. असं सांगून राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांची एक गोड आठवण शेअर केली. मात्र काहींनी राहुल गांधी यांना ट्रोल केलं. सार्वजनिक कार्यक्रमात अशा कौटुंबिक वैयक्तिक गोष्टी कोणी सांगत का? यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले. मात्र अनेकांनी राहुल गांधी यांची बाजू घेऊन भाषण करताना एक मुलगा आपल्या आई वडिलांमधील प्रेमळ प्रसंग सांगत होता, त्याशिवाय यात काहीही नव्हतं.
हेही वाचा : 6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड
रितेश देशमुखची सूचक पोस्ट :
राहुल गांधी यांच्या या विधानावर टीका केली जात असतानाच अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जिनिलिया सोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये रितेश देशमुखच्या मांडीवर पत्नी जिनिलिया बसली होती आणि दोघे जेवणाचा आनंद घेत होते. या पोस्टला रितेशने कॅप्शन दिलंय की, 'टेबल फॉर टू , चेअर ऑर वन'. रितेश देशमुखचं कुटुंब हे काँग्रेस पक्षातील आहे. त्याचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर भाऊ अमित देशमुख हे काँग्रेसच्या तिकिटावर स्वतः लातूर शहरातून आमदार आहेत. हा फोटो पोस्ट करून रितेश देशमुखला नेमकं काय म्हणायचं आहे याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.