• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'तिथे माझ्यासोबत कोणीतरी...', सलमानने सांगितला बेडरुममधील हादरवणारा भूताचा अनुभव; 'ती अतिशय सुंदर स्त्री...'

'तिथे माझ्यासोबत कोणीतरी...', सलमानने सांगितला बेडरुममधील हादरवणारा भूताचा अनुभव; 'ती अतिशय सुंदर स्त्री...'

हा सारा प्रकार ऐकून थक्क झालेल्या करणने सलमानला पुढचा प्रश्न विचारला असता सलमानने याबद्दल सविस्तरपणे सांगितलं. त्याने त्याच्या बेडरुममध्ये नेमकं काय काय व्हायचं याचा संपूर्ण तपशील दिला. नेमकं काय म्हणाला सलमान जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 15, 2026, 08:22 AM IST|Updated: Oct 15, 2026, 08:42 AM IST
joinshare
'तिथे माझ्यासोबत कोणीतरी...', सलमानने सांगितला बेडरुममधील हादरवणारा भूताचा अनुभव; 'ती अतिशय सुंदर स्त्री...'
Image Credit: सलमानने करण जोहरला सांगितला अनुभव (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नवाजलेल्या दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो, 'कॉफी विथ करण'चा 9 वा सीझन सुरू झाला आहे. जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत असलेल्या या सीझनच्या पहिल्याच भागात सुपरस्टार सलमान खान पाहुणा म्हणून सहभागी झाल्याचं दिसून आलं. यापूर्वीच्या पर्वामध्येही सलमान सहभागी झालेला. मात्र यावेळेस करणने सलमानसोबत चर्चा करताना एक जुना किस्सा सांगितला. 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी करण सलमानच्या घरी गेला होता, तेव्हाचा किस्सा करणने सांगितला. सलमानच्या घरी एक अतिशय लहान बेडरूम होती, जिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता, असं करण म्हणाला. या घराचा उल्लेख निघताच, सलमानने लगेच त्या बेडरूममध्ये त्याला काही पॅरानॉर्मल अनुभव आल्याचं सांगितलं.

त्या बेडरुममध्ये माझ्यासोबत सतत कोणीतरी असायचं

सलमानने करणला या बेडरुमसंदर्भातील आठवण सांगताना, "त्या खोलीत मी कधीही एकटा राहिलो नाही. तिथे माझ्यासोबत कोणीतरी असायचे. ज्याला मी कधी पाहिले नाही, फक्त ऐकले आहे आणि माझ्या मागे कोणाच्या तरी उपस्थितीची जाणवी मला इथं असताना कायम व्हायची," असं म्हटलं. हा सारा प्रकार ऐकून थक्क झालेल्या करणने सलमानला कोणी तरी असायचे म्हणजे, "कोण?" असा सवाल केला. त्यावर सलमानने, "जेव्हा जेव्हा मी त्या बेडरुममधून बाहेर पडायचो, तेव्हा दिवे आपोआप चालू-बंद व्हायचे. कपाटे उघडायची, म्युझिक सुरू व्हायचे. बाथरूममध्ये असताना मला जाणवायचे की बाहेर कोणीतरी कपाटांशी खेळत आहे. तेव्हा मला खात्री पटली की तिथे नक्कीच कोणीतरी आहे," असं उत्तर दिलं.

भूत-प्रेतांचा वावर होता का?

हे ऐकून करणने थेट, "म्हणजे तिथे भूत-प्रेतांचा वावर होता का?" असा थेट प्रश्न विचारला. सलमानने यावर, "भूत-प्रेत असे म्हणण्यापेक्षा, माझ्या मागे कोणाची तरी उपस्थिती मला जाणवायची. जेव्हा मी तिथे म्युझिक लावायचो तेव्हा मला माझ्या मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवायची. तेव्हा मी गंमतीने विचारायचो, 'तुम्हाला कोणते संगीत ऐकायला आवडेल?' मग मी फक्त बटण दाबायचो आणि बाहेर निघून जायचो," असं सांगितलं.

विचित्र घटनाही सांगितल्या

सलमान खानने आणखी काही विचित्र घटनाही सांगितल्या.  "आधी तिथे बिलियर्ड्स टेबल होते. आम्ही जेव्हा बिलियर्ड्स खेळायचो, तेव्हा आतून आवाज यायचे—कधी कपाट उघडल्याचा, तर कधी म्युझिक सुरू झाल्याचा," अशी आठवणही सलमानने येथील गूढ घटनांबद्दल माहिती देताना सांगितली. 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by JioHotstar Reality (@jiohotstarreality)

तू घाबरलेलास? प्रश्नावर सलमान काय म्हणाला?

यामुळे तू घाबरला होता का? या करणच्या प्रश्नावर सलमानने, "नाही! त्याने मला काहीही त्रास दिला नाही. माझी फक्त एकच विनंती होती की, जर तिथे कोणी असेल आणि ती एखादी अतिशय सुंदर स्त्री असेल—तर तिने मला स्वतःचे रूप दाखवावे!" असं मजेदार उत्तर दिलं. करणने या भागात करिश्मा कपूरला विशेष पाहुणी म्हणून आमंत्रित केले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Salman Khan
Entertainment News