अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये तीन हल्लेखोरांबरोबरच त्यांना शस्त्र पुरवणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीमध्ये रोज नवीन माहिती समोर येत आहे. अशातच या आरोपींनी टायगरवर हल्ला केला असला तरी त्यांचं टार्गेट इतर व्यक्तीचं असल्याचं तपासात पुढे आले आहे. या आरोपींनी केवळ टायगरच नाही तर अभिनेता सलमान खान, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमीर खानसारख्या कलाकारांच्या घराबाहेर रेकी केल्याचं स्पष्ट झालं आहे. बिश्नोेई टोळीमधील अनिल पंडितने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असल्याने सलमान टार्गेवर असल्याचं स्पष्ट झालं आहे. टायगरवरील हल्ल्यानंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा अपडेट करण्यात आली आहे.
टायगरवरील हल्ल्यानंतर काय काय बदल?
सलमानचं घर असलेल्या 'गॅलक्सी'बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टायगरवरील हल्ल्यानंतर सलमानच्या घराबाहेरची सुरक्षा अपडेट करतानाच बुलेटप्रूफ जॅकेट असलेले पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एवढ्यावरच न थांबता एआय तंत्रज्ञान वापरण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सलमानच्या घरासमोरच दोन तात्पुरत्या पोलीस पोस्ट उभारण्यात आल्या आहेत. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी हाय-टेक एआय सीसीटीव्ही कॅमेरांबरोबरच संपूर्ण इमारतीला विजेच्या तारांचं कुंपण (इलेक्ट्रीक फेन्सींग) घालण्यात आलं आहे. सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना बुलेटप्रूफ जॅकेट देण्याबरोबरच आधुनिक एमपी5 सबमशीन गन्स देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून व्हाय प्लस सुरक्षा
एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केल्या होत्या. त्यानंतर सातत्याने सलमानला बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेत ती अपडेट केली आहे. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांचे साधारण 11 ते 12 जवान तैनात असतात. यामध्ये चार सशस्त्र कमांडोचा समावेश असतो. हे चार कमांडो कायम त्याच्यासोबत असतात.
थ्री लेअर सिक्युरीटी
सरकारकडून देण्यात आलेल्या सुरक्षेबरोबरच सलमानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मधील घराबाहेर कडेकोट पहारा असतो. त्याचप्रमाणे सलमान घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्या कारसोबत एस्कॉर्ट वाहन आणि खासगी सुरक्षा रक्षकांचेही कडे असते. बॉडीगार्ड शेरा आणि त्याची टीम टीम सलमानला खासगी सुरक्षा पुरवते. सलमानभोवती तीन स्तरांचे सुरक्षा कवच असते.
सलमानच्या घराबाहेरील सहा बदल कोणते?
1 - एआय तंत्रज्ञान असलेले कॅमेरा
2 - बुलेट प्रूफ काचा अपडेट केल्या
3 - इलेट्रीक फेन्सिंग
4 - सुरक्षेतील पोलिसांना बुलेट प्रूफ जॅकेट
5 - पोलिसांना एमपी5 सबमशीन गन्स
6 - दोन तात्पुरत्या पोलीस चौक्या