SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'पोलीस तुला कधीपर्यंत वाचवतील?', आयुष्यमान खुरानाला मिळालेल्या धमकीची खळबळजनक ऑडिओ क्लिप आली समोर!

काही दिवसांपुर्वीच अभिनेता आयुष्मान खुरानाला एक धमकीवजा ऑडिओ मेसेज मिळाला. या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपीने काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 09, 2026, 18:52 IST | Updated: Nov 09, 2026, 19:14 IST
Image Credit: आयुष्यमान खुराना
Join

गेले काही दिवस बॉलिवूडच्या अभिनेत्यांना धमकीचे कॉल येण्याच्या घटना समोर येतायत. अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेकांना धमकी देणारे कॉल आल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वैभव मिश्रा याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी वैभव मिश्रा हा आयटी इंजिनिअर असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्रभावाखाली असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान आयुष्यमान खुरानाला दिलेल्या धमकीची ऑडीयो क्लिप समोर आली आहे. काय आहे यात? आरोपीने ऑडिओमध्ये नेमके काय म्हटले आहे, ते जाणून घेऊया. सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलंय नेमकं?

नुकताच अभिनेता आयुष्मान खुरानाला एक धमकीवजा ऑडिओ मेसेज मिळाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी या कथित संभाषणाचा ऑडिओ समोर आणलाय. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता.मात्र, नंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि पोलीस तपासात असे समोर आले की, त्याचा बिश्नोई टोळीशी कोणताही संबंध नव्हता. 

ऑडिओमध्ये काय आहे?

ऑडिओमध्ये आरोपी आयुष्मानला म्हणतो, "मी अनिल पंडित बोलतोय; मी लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तू फोन उचलला नाहीस आणि नंतर तो कट केलास. काही हरकत नाही. आम्हाला फक्त एक निरोप द्यायचा आहे. आमच्याशी बोल. जर तुला काही गोष्टी मिटवायच्या असतील, तर तसे कर. पण जर तुझी हीच वृत्ती राहिली, तर टायगर श्रॉफसोबत जे घडले, तेच तुझ्याबतही घडू शकते. आमच्याकडे चंदीगडमधील तुझ्या घराचा पत्ताही आहे आणि तू इथे कुठे राहतोयस, हेही आम्हाला माहीत आहे."

आरोपी पुढे म्हणतो, "आमच्याकडे तुझ्या बाईकचा नोंदणी क्रमांकही आहे. बघ, आम्हाला फक्त एकदा तुझ्याशी बोलायचे आहे. एकदा का तू आमच्याशी बोललास, की आम्ही तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही. जर तू बोलायला तयार असशील, तर आम्हाला काहीही अडचण नाही. आम्ही फक्त तुमच्याशी संवाद सुरू करण्यासाठी फोन केला होता."

'तुमच्या कुटुंबातील जो कोणी आमच्या हाती लागेल, आम्ही त्याला संपवून टाकू.'

संभाषण करणारी व्यक्ती एवढ्यावरच थांबत नाही. ती आयुष्यमान खुरानाला पुढे म्हणते, "आमचा निरोप ऐकल्यानंतर आम्हाला परत फोन कर. जर तू तसे केले नाही, तर आम्ही असे समजू की तू दुसरा मार्ग निवडलायस. म्हणजेच तू पोलिसांकडे जाण्याचा विचार करत आहेस. तू पोलिसांकडे जाऊ शकतोस, आम्हाला काहीही हरकत नाही. पण जे लोक तुम्हाला सुरक्षा देत आहेत, ते तुला किती काळ वाचवू शकतील? आमच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी तुला दररोज नशिबाची साथ लागेल. आम्हाला तुला इजा पोहोचवण्यासाठी फक्त एकदा नशिबाची साथ मिळाली तरी खूप आहे. "आम्ही तुझा, तुझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा किंवा आमच्या हाती लागणाऱ्या इतर कोणाही व्यक्तीचा खात्मा करू. आमच्याशी बोलून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवणं तुझ्या हिताचे ठरेल. आम्ही तुझ्या कॉलची वाट पाहत आहोत."

खरा गुन्हेगार कोण होता?

मुंबई गुन्हे शाखेने खंडणी आणि धमकावण्याच्या या प्रकरणात बेंगळुरू येथून 30 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. वैभव मिश्रा असे या आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने आयटी इंजिनिअर आहे. त्यानेच लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव वापरून आयुष्मान खुराना यांना धमकावणारा ऑडिओ संदेश पाठवल्याचा आरोप आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES