एकदिवसीय मालिकेआधी गुरनूर ब्रारचे शर्टलेस फोटो आणि चॅट्स व्हायरल! Fact Check
भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण कऱणारा गुरनूर ब्रार सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या मालिकेच्या दरम्यान टीम इंडियाचा खेळाडू गुरनूर ब्रारचे काही अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
Gurnoor Brar Private Chat Leak : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये नुकतीच टी20 मालिका पार पडली, या मालिकेमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला. भारताचा संघ आता एकदिवसीय मालिका देखील न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे, भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण कऱणारा गुरनूर ब्रार सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या मालिकेच्या दरम्यान टीम इंडियाचा खेळाडू गुरनूर ब्रारचे काही अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. एवढेच नाही तर गुरनूर ब्रारची एक खाजगी चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर फिरत असलेले गुरनूर ब्रारचे फोटो आणि चॅट्स व्हायरल होत आहेत, झी 24 तास या बातमीला क्रिकेटनेही याला दुजोरा दिलेला नाही.
सोशल मिडियावर गुरनूर ब्रार याची स्नॅपचॅट ॲपमधील चॅटचा स्क्रीनशॅाट व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याचा चॅटमध्ये गुरनूरचा शर्ट नसलेला एक फोटो देखील आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या शरीराचा थोडासा भाग टॉवेलने झाकला आहे. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हा भारतीय संघातील खेळाडू गुरनुर ब्रारचं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या गळ्यामधील साखळीचा पुरावा घेत आहेत. त्यांच्या मैदानातील फोटोमध्ये त्याने गळ्यामधील साखळीशी तुलना करत आहेत. कारण त्याने दुसऱ्या फोटोमध्ये घातलेली फोटो आणि तो फोटोमधील साखळी हे दोन्ही जुळत आहेत.
हे ही वाचा
न्यूझीलंडने सामना जिंकला पण मालिका गमावली! टीम इंडियाने किवी संघाला घरच्या मैदानावर केलं पराभूत
गुरनूर ब्रारच्या क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर भारताची आगामी एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी गुरनूर ब्रारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतामध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाकडून क्रिकेट खेळणाऱ्या गुरनूरची उंची 6 फूट 5 इंच आहे आणि यावर्षी त्याने भारतीय संघासाठी जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले.
गुरनूर ब्रारने पंजाबसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 22 प्रथम-श्रेणी सामने, 28 लिस्ट ए सामने आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये 71, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 26 आणि टी20 क्रिकेटमध्ये 18 बळी आहेत.