भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिका पाच सामन्यांची पार पडली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने 3-2 असा विजय मिळवला आता टीम इंडियाचा पुढील सामना कधी होणार यासंदर्भात संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला देणार आहोत. भारताच्या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टी20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची नजर आता एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये टीम इंडियाचे दोन्ही स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे भारतीय संघामध्ये पुनरागमन होणार आहे. टीम इंडियाचा पुढील सामना कधी आणि कुठे होणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे ही मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये शुभमन गिल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंनाही स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. भारताच्या राखीव खेळाडूंची ताकद आणि आगामी मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
हे ही वाचा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना हा 4 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा पहिल्या एकदिवसीय मालिकेचा सामना ईडन पार्क, ऑकलंड येथे आयोजित केला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला सुरुवात सकाळी 7.30 वाजता होणार आहे. तर न्यूझीलंडमध्ये या सामन्याला सुरुवात दुपारी 3.00 वाजता होणार आहे. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार 7.00 वाजता मैदानात येतील.
दरम्यान, भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही खेळाडू या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, दोन्ही फलंदाज नेटमध्ये सराव करताना दिसले. ही मालिका 4 नोव्हेंबरपासून ऑकलंडमधील ईडन पार्क येथे सुरू होणार आहे.